घरताज्या घडामोडी'शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईनमध्ये राहण्याची भूक' काँग्रेसच्या नेत्याची राऊत यांच्यावर टीका

‘शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईनमध्ये राहण्याची भूक’ काँग्रेसच्या नेत्याची राऊत यांच्यावर टीका

Subscribe

शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असे संजय राऊत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर उलटसुलट चर्चा सुरु असताना ही भेट वेगळ्या कारणासाठी होती, असे सांगण्याचा खटाटोप केला जात आहे. यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी शिवसैनिक असलेल्या संजय निरुपम यांनी मात्र संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे.

संजय निरुपम यांनी राऊत-फडणवीस भेटीवर एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, “शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये बनविण्याची चांगलीच भूक लागली आहे. ही भूक राजकीय नेत्यांना बहुतेकवेळा खाऊन टाकते. ही दुर्भावना नसून एक वास्तविकता आहे.”

- Advertisement -

शनिवारी (दि. २६ सप्टेंबर) संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांनी ग्रँड हयात हॉटेलमध्ये दुपारी भेट घेतली होती. या भेटीची बातमी बाहेर आल्यानंतर माध्यमांसहीत राजकारणातही मोठी खळबळ झाली. महाविकास आघडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच या दोन नेत्यांची भेट होत असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. त्यातच मविआ सरकार स्थापन होत असताना याच ग्रँड हयात हॉटेलमध्ये तीनही पक्षांच्या आमदारांना एकत्र आणण्यात आले होते. त्यामुळे या हॉटेलचा हॅशटॅगही संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -