घरदेश-विदेशCovid-19 in US: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी मेलानिया पॉझिटिव्ह

Covid-19 in US: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी मेलानिया पॉझिटिव्ह

Subscribe

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी स्वतःची कोरोनाची टेस्ट केली असून दोघेही रिपोर्टच्या प्रतिक्षेत

जगभरात कोरोनाचा फैलाव सुरू असून कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिका या देशाला बसला आहे. मात्र आता हा जीवघेणा कोरोना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानी अर्थात व्हाइट हाऊस येथे पोहोचला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी स्वत: ला क्वारंटाइन केले आहे. दोघांचेही नमुने घेण्यात आले असून कोरोना रिपोर्ट यायचे बाकी होते मात्र त्या दोघांचा रिपोर्ट आता कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

- Advertisement -

ट्रम्प यांचे सल्लागार डोप सिक्स कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली. त्यांनी ट्विट करून असे लिहिले, होप सिक्स सलग काम करत राहिले. आता त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. फर्स्ट लेडी आणि मी आमच्या कोरोना रिपोर्टची वाट पाहत आहोत. तोपर्यंत आम्ही दोघे स्वत: ला क्वारंटाइन करत आहोत, असे सांगितले होते.

- Advertisement -

 

दरम्यान, जगातील कोरोना रुग्णांपैकी अमेरिका आणि ब्राझीलमध्ये ३६ % कोरोना रुग्ण आहे, परंतु अमेरिका -ब्राझीलमध्ये नवीन रुग्णांची गती भारताच्या तुलनेत निम्मी आहे. दररोज, कोरोनाची बहुतेक कोरोना रुग्णांची नोंद भारतात होत आहेत आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही भारतात वेगवान दराने वाढत आहे. तर जगातील कोरोना रूग्णांपैकी ५४ टक्के रूग्णांची नोंद अमेरिका, भारत आणि ब्राझीलमध्ये आहेत. इतकेच नव्हे तर या तीनही देशांमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण ४५ टक्के आहे.


अमेरिकेच्या ‘एअर फोर्स वन’ला टक्कर देतंय, पंतप्रधान मोदींचे ‘एअर इंडिया वन’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -