घरफिचर्ससारांशबॉलिवुडला ओढ तरुण खलनायकांची

बॉलिवुडला ओढ तरुण खलनायकांची

Subscribe

सैफ अली खानने ओमकारा आणि तान्हाजी या दोन्ही सिनेमात साकारलेला खलनायक प्रेक्षकांना आवडला होता. ओंकारा मधला लंगडा त्यागी असो किंवा तान्हाजी मधला उदयभान दोन्ही पात्रात त्याने केलेला अभिनय उत्तम असल्याने लोकांना तो आवडला. रणवीर सिंगने ‘पद्मावत’मध्ये साकारलेला अल्लाउद्दीन खिलजी, संजय दत्तचा ‘अग्निपथ’मधील कांचा, ‘खलनायक’ आणि ‘पानिपत’मधील अब्दाली, रितेश देशमुखचा एक विलन आणि मर्जावामधला खलनायक लोकांनी पाहिलाय आणि पसंतदेखील केलाय. आपल्या आवडत्या नायकांना खलनायक म्हणून पसंत करण्याचा हा ट्रेंड आता कुठे गाजताना पाहायला मिळतोय. 20 वर्षांपूर्वी असे प्रयोग फार होताना दिसत नव्हते.

हिंदी सिनेमात खलनायकाची जागा नेहमीच नायकाच्या नंतरची राहिली आहे, नायिकेपेक्षा थोडी का होईना मोठी भूमिका खलनायकाला दिली जाते. जुन्या हिंदी सिनेमात अमजद खानपासून ते अमरीश पुरीपर्यंत अनेक मोठे खलनायक असायचे, त्यांची विचित्र हेअरस्टाईल किंवा बघूनच राग येईल असा त्यांचा एकंदर लुक, पण गेल्या काही काळात हिंदी सिनेमातील खलनायकाना देखील एक ग्लॅमर प्राप्त झालंय, नायकाप्रमाणे देखणे, सिक्स पॅक असणारे अनेक खलनायक सध्या इंडस्ट्रीत वावरतात. त्यांचा लुक आणि अभिनय यामुळे कधी कधी तर नायकापेक्षाही वरचढ ठरणार्‍या या खलनायकांचा एक फॉलोअर तयार झालाय. शाहरुख खानसारख्या सुपरस्टार ने जेव्हा खलनायकाची भूमिका साकारली होती, त्या काळात ती खूप मोठी रिस्क मानली गेली. पण अलीकडच्या काळात अक्षय कुमार, आमिर खान, सैफ अली खान यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांनी खलनायक साकारल्या नंतर आता हे धाडस बॉलीवुडमधील अन्य कलाकारदेखील करायला तयार आहेत. बहुतांश सिनेमाच्या कथेत शेवटी मार खाणारा आणि नायकाच्या हातून मरणारा अशी जरी खलनायकाची ओळख असली तरी, संपूर्ण चित्रपटभर नायकाला हरवणारा हा खलनायक असतो हे विसरून चालणार नाही. म्हणूनच अलीकडच्या काळात खलनायकाच्या भूमिकेसाठीदेखील मोठी शर्यत सिनेमात पाहण्यास मिळते. अनेक सिनेमे हे तर केवळ त्यात असणार्‍या खलनायकामुळे चर्चिले जातात, म्हणून अनेक नवोदित आणि तरुण अभिनेत्यांचा खलनायक साकारण्याकडे कल दिसून येतो.

सैफ अली खानने ओमकारा आणि तान्हाजी या दोन्ही सिनेमात साकारलेला खलनायक प्रेक्षकांना आवडला होता. ओंकारा मधला लंगडा त्यागी असो किंवा तान्हाजी मधला उदयभान दोन्ही पात्रात त्याने केलेला अभिनय उत्तम असल्याने लोकांना तो आवडला. रणवीर सिंगने ‘पद्मावत’मध्ये साकारलेला अल्लाउद्दीन खिलजी, संजय दत्तचा ‘अग्निपथ’मधील कांचा, ‘खलनायक’ आणि ‘पानिपत’मधील अब्दाली, रितेश देशमुखचा एक विलन आणि मर्जावामधला खलनायक लोकांनी पाहिलाय आणि पसंतदेखील केलाय. आपल्या आवडत्या नायकांना खलनायक म्हणून पसंत करण्याचा हा ट्रेंड आता कुठे गाजताना पाहायला मिळतोय. 20 वर्षांपूर्वी असे प्रयोग फार होताना दिसत नव्हते. फक्त मेल सुपरस्टारच नव्हे तर काही नायिकांनीदेखील खलनायकाची, उत्तम भूमिका गेल्या काही काळात साकारलेली पाहायला मिळाली. प्रियंका चोप्राचा ‘7 खून माफ’मधला अभिनय आजही लक्षात राहतो, तिने साकारलेली खलनायकाची भूमिका तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम भूमिकांपैकी एक आहे.

- Advertisement -

श्रीराम राघवनच्या ‘अंधाधून’ या सुपरहिट सिनेमात तब्बूने साकारलेली भूमिकादेखील चांगली होती, तर बदला सिनेमात तापसी पन्नूनेदेखील नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांची मन जिंकण्याचा उत्तम प्रयत्न केलाय. बॉलिवुडच्या मुख्य धारेतील कलाकारांनी अशा भूमिका केल्यानं आता नव्याने या क्षेत्रात येणार्‍या कलाकारांना अशा भूमिका करण्यास कुठलीही हरकत नाही. मुख्य कलाकार वगळता बॉलीवूडमध्ये आजही अनेक असे कलाकार आहेत जे त्यांच्या नकारात्मक भूमिकांसाठी ओळखले जातात. आशुतोष राणा, के के. मेनन, गुलशन ग्रोवर, प्रकाश राज, पंकज त्रिपाठी, नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी साकारलेल्या विविध नकारात्मक भूमिका सिनेमाला एका उंचीवर घेऊन गेल्या आहेत. यातील बरेचसे अभिनेते तर केवळ त्यांच्या नकारात्मक भूमिकांसाठी ओळखले गेलेत, तर काही अभिनेत्यांना त्यांच्या नकारात्मक भूमिकांच्या जोरावर सिनेमात दुसरे रोल्स मिळाले आहेत.

लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक चर्चिला गेलेला कलाकार म्हणजे सोनू सूद, याला नव्या पिढीचा सिक्स पॅकवाला हँडसम विलन म्हणून ओळखले जाते. तरुण खलनायकाच्या यादीत सोनू सुद हे नाव अग्रस्थानी असेल, अनेक सुपरहिट सिनेमात विलनची भूमिका त्याने केली आहे. बॉलिवुडमधील महागडा विलन अशी त्याची ओळख तर आहेच, पण फॅन फोलोविंगसुद्धा एका सुपरस्टार एवढी आहे. सोनू सूद नंतर दुसरा हँडसम विलन म्हणजे ताहीर राज भसीन, मर्दानी सिनेमातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेला हा अभिनेता त्याच्या नकारात्मक भूमिकेसाठी बॉलीवूडमध्ये ओळखला जातो. फोर्स 2 सारख्या सिनेमात जॉन अब्राहम विरुद्ध खलनायक त्याने साकारला होता, ज्यासाठी त्याला समीक्षकांची वाहवादेखील मिळाली. त्याच्या याच नकारात्मक भूमिकांच्या जोरावर त्याला छिछोरे आणि 83 सारख्या सिनेमात भूमिका मिळाल्या आहेत. साजद डेलाफ्रोज, फ्रेडी दारूवाला हेही असेच दोन तरुण खलनायक आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीत नाव कमावले आहे.

- Advertisement -

फ्रेडी दारूवाला कमांडो 2, हॉलिडे, रेस 3 या सिनेमात दिसला आहे तर, साजदने सलमान खानच्या टायगर जिंदा है, सिनेमात अबू उस्मानची भूमिका साकारली आहे. सलमान खानच्या बर्‍याच सिनेमात खलनायक म्हणून एक चेहरा आपल्याला पाहायला मिळतो, ज्याने शाहरुखच्या चेन्नई एक्स्प्रेसमध्ये सुद्धा थांगापल्ली नावाचं पात्र केलं होतं, असा निकीतीन धीर हादेखील तरुण खलनायक म्हणून नावारूपास आलाय. रेडी, दबंग 2, हाऊसफुल 4, चेन्नई एक्स्प्रेस यांसह अनेक दाक्षिणात्य सिनेमात खलनायकाची भूमिका निकितन धीर याने केली आहे. याच यादीत अजून एक नाव म्हणजे गुलशन देवैया, रामलीला, मर्द को दर्द नही होता आणि कमांडो 3 यांसारख्या सिनेमात या तरुण कलाकाराने नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. कमांडो 3 मध्ये बुराक अंसारी हे त्याने साकारलेलं पात्र प्रेक्षकांना आवडलं होतं. आपल्या पहिल्याच सिनेमात समीक्षकांची आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवणारा खलनायक म्हणून मर्दानी 2 मधील विशाल जेठवा आपल्याला परिचित आहे. वयाच्या पंचवीशीतच यश राज बॅनरच्या सिनेमात खलनायक म्हणून काम करण्याची संधी त्याला मिळाली ज्याचं सोनं विशालने केलंय. या सर्व तरुण खलनायकांशिवाय विजय वर्मा, राणा दग्गुबत्ती, रोनित रॉय, राहुल देव यांसारखे अनेक असे चेहरे आहेत, ज्यांना बॉलीवूडमध्ये सध्या खलनायकाच्या अनेक भूमिका ऑफर केल्या जातात.

मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, इरफान, सौरभ शुक्ला, जयदीप अहलावट, आशुतोष राणा ही बॉलिवुडमधील अशी नावं आहेत, ज्यांनी त्यांना मिळालेल्या प्रत्येक भूमिकांमधून आपलं काम दाखवून दिलंय. पण तरीही या सर्व अभिनेत्यांची विशेषत: त्यांच्या नकारात्मक भूमिकांमध्ये दडलेली होती. सौरभ शुक्ला म्हणजे कॉमेडी करणारा अभिनेता असाच समज सामान्य प्रेक्षकांत होता, पण जेव्हा रेड सिनेमात त्याने रामेश्वर सिंग उर्फ राजाजीची भूमिका साकारली तेव्हा सर्वांनीच त्याची वाहवा केली. नवाजुद्दीन सिद्दीकीदेखील आपल्या नकारात्मक भूमिकांमधून हिट झालेला अभिनेता आहे. रमण राघव 2.0 ने इंडस्ट्रीत ओळख निर्माण झालेला नवाज हा सलमानच्या किक सिनेमातील शिव गज्राच्या भूमिकेनंतरच सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकला. त्याच्या कारकिर्दीतील मोठा म्हणून ओळखल्या गेलेला बजरंगी भाईजान हा सिनेमादेखील त्याला यामुळेच मिळाला.

मनोज वाजपेयींनीदेखील त्याच्या कारकीर्दीत अनेक नकारात्मक भूमिका केल्या आहेत. कौन, अक्स, रोड, विर झारा, गँग्ज ऑफ वासेपुरपासून ते बाघी 2 आणि मिसेस सिरीयल किलरपर्यंत अनेक सिनेमातील त्याच्या नकारात्मक भूमिकांना प्रेक्षकांनी उचलून धरलं. नुकताच आपल्यातून निघून गेलेला उमदा कलाकार इरफान याला इंडस्ट्रीत ओळख त्याच्या हासिल सिनेमाने मिळवून दिली होती, ज्यात त्याने नकारात्मक भूमिका केली आहे. एकंदरीत काय तर विलन म्हणून प्रेक्षकांकडून राग किंवा तिरस्कार मिळण्याचा काळ आता गेलाय, आधी खलनायक साकारणार्‍या अभिनेत्यांना तितका प्रतिसाद मिळत नव्हता असं नाही, पण त्यांची इमेज ही तीच खलनायकाची असायची. पण आता मात्र अनेक चॉकलेट हिरो खलनायक साकारत आहेत आणि त्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाददेखील मिळतोय. विचित्र दिसणारा, काळा, टकला किंवा अजब कपडे घालणार्‍या खलनायकांचा काळ जाऊन सिक्स पॅक चॉकलेट बॉय असणार्‍या खलनायकांचा काळ बॉलीवूडमध्ये आलाय, हीदेखील चांगली गोष्ट आहे.

-अनिकेत म्हस्के 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -