घरदेश-विदेशकेरळात पावसाचे ३२४ बळी

केरळात पावसाचे ३२४ बळी

Subscribe

केरळमध्ये पावसामुळे १७४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पावसामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ३२४ वर पोहोचली आहे.

मुसळधार पावसाने केरळमध्ये अक्षरक्ष: हाहा:कार उडवून दिला आहे. आत्तापर्यंत पावसामुळे ३२४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जनजीवन देखील पूर्णता ठप्प झाल्याचे चित्र सध्या केरळमध्ये पाहायाला मिळत आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी देखील सध्या आम्ही अंत्यंत गंभीर परिस्थितीतून जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हजारो लोकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. रस्ता, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर देखील त्याचा गंभीर परिणाम झाल्याचे चित्र पाहायाला मिळत आहे. दरम्यान, कोची विमानतळ देखील शनिवार पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. मागील आठ दिवसामध्ये केरळमध्ये १७४ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पावसामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या आता ३२४ वर पोहोचली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस देखील पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

१०० वर्षातील सर्वाधिक मुसळधार

मागील १०० वर्षामध्ये तरी केरळमध्ये एवढा मुसळधार पावसाची नोंद झालेली नव्हती. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे केरळमध्ये शेतीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्याने नद्यांना देखील पूर आला आहे. यामध्ये आत्तापर्यंत ३२४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. २ लाखापेक्षा देखील जास्त लोक सध्या रिलीफ कॅम्पमध्ये राहत आहेत. अनेक ठिकाणी जमीन खचल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत. मुसळधार पावसामुळे बचावकार्यामध्ये देखील अडथळे निर्माण होत आहेत.

- Advertisement -
वाचा – केरळमध्ये पूरस्थिती; कोची विमानतळ शनिवारपर्यंत बंद!!

मोदी करणार केरळचा दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शनिवारी सकाळी केरळचा दौरा करणार आहेत. यावेळी केरळमधील परिस्थितीचा हवाई पाहणीतून आढावा घेतला जाणार आहे. यासंदर्भात केरळच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून संवाद देखील साधला आहे. सध्या केरळमधील बचावकार्यामध्ये लष्कराच्या १६ टीम्स, नौदलाच्या २८ टीम्स आणि NDRFच्या ३९ टीम्स दाखल झाल्या आहेत. आत्तापर्यंत ४ हजार लोकांना रेक्सु करण्यात आले आहे. रिलीफ कॅम्पमध्ये देखील हेलिकॉप्टरच्या साहाय्याने जेवणाचे वाटप केले जात आहे. दरम्यान, लष्कर देखील मदतकार्यासाठी रेल्वेची मदत घेणार असून रेल्वेच्या मदतीने लोकांना अन्न पुरवले जाणार आहे. सध्या प्रशासनाने मिळेल त्या वाहनाने लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरूवात केली आहे. जखमींवर उपचार करताना औषधांची कमतरता देखील जाणवत आहे. पावसाचा जोर केव्हा ओसरेल याकडे सध्या केरळातील लोकांचे डोळे लागून राहिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -