घरट्रेंडिंगया वर्षी संपणार पृथ्वीच्या पोटातील सर्व सोने; जाणून घ्या काय आहे भविष्य

या वर्षी संपणार पृथ्वीच्या पोटातील सर्व सोने; जाणून घ्या काय आहे भविष्य

Subscribe

सोने हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. सोन्याची दागिने परिधान करायला न आवडारे दुर्मिळच. मात्र हेच सोने आता आवाक्याच्या बाहेर झाले आहे. सध्या सोन्याचे दर ५७ हजार प्रति तोळे झाले असून येत्या काळात आणखी महागण्याची शक्यता आहे. अशातच एका धक्कादायक बाब समोर आली असून सोने संबंधित जागतिक कंपनी गोल्डमन सॅचने एक अहवाल समोर आणला आहे. आणखी १५ वर्षात म्हणजे २०३५ सालापर्यंत पृथ्वीच्या पोटातील म्हणजे सोने खाणीमधील सर्व सोने बाहेर काढून संपलेले असेल. त्यामुळे जमिनीखाली सोने राहणार नाही, अशी माहिती या अहवालात प्रसिद्ध झाली आहे.

गेले काही महिने सोन्याचे दर वाढत चालले असून जगभर त्याची चर्चा होत आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलनेही काही दिवसांपूर्वी एक अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये, पृथ्वीच्या पोटात आता अंदाजे ५४ हजार टन सोने शिल्लक असावे. पृथ्वीच्या पोटात जेवढे सोने होते त्याचा हा ३० टक्के भाग आहे. म्हणजे ७० टक्के सोने बाहेर काढले गेले आहे, असे नमूद केले आहे. शिवाय या खाणीतून काढल्या गेलेल्या ७० टक्के सोन्यापैकी ५० टक्के सोने दागिने घडवण्यासाठी वापरले गेले असून ते खासगी मालकीचे बनले आहे. नेमके कोणत्या देशाकडे किती सोने आहे, हे सांगणे कठिण असल्याचेही त्यात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

‘गरज पडली, तर मुख्यमंत्र्यांनाही भेटेन’, राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -