घरताज्या घडामोडीरणजितसिंह डिसलेंना कोरोनाची लागण, मुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंच्याही आले होते संपर्कात

रणजितसिंह डिसलेंना कोरोनाची लागण, मुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंच्याही आले होते संपर्कात

Subscribe

शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल टीचर’च्या पुरस्काराचे विजेते रणजितसिंह डिसले यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल टीचर’च्या पुरस्काराचे विजेते रणजितसिंह डिसले यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी ही माहिती स्वत: whatsapp स्टेट्सवर पोस्ट केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वीच त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींच्या संपर्कात आले होते.

माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करावी

‘ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या आहेत त्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी. कोणतीही रिस्क घेऊ नये’,अशी विनंती डिसले यांनी एका प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे.

- Advertisement -

शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कारासाठी ५० जागतिक शिक्षकांची नामांकन जाहीर करण्यात आली होती. यामध्ये सोलापूरच्या जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ‘ग्लोबल टीचर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, मुंबईहून ते गावी आल्यानंतर त्यांना लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्यांनी कुटुंबातील सर्वांचीच कोरोना चाचणी केली, त्यामध्ये रणजितसिंह आणि त्यांची पत्नी यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर घरातील इतर मंडळींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.


हेही वाचा – ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते डिसले यांचा शिक्षणमंत्र्यांकडून सत्कार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -