घरताज्या घडामोडीबाय...बाय...२०२० Welcome २०२१

बाय…बाय…२०२० Welcome २०२१

Subscribe

कोरोनाच्या विषाणूमुळे २०२० हे वर्ष कधी संपल हे कळलंही नाही. खूप वेगळा आणि फार कठीण काळ होता. पण, आता हे वर्ष संपून नवं वर्ष सुरु झालं आहे. त्यामुळे नवं वर्ष अगदी धूमधडाक्यात नाही पण, अगदी साधेपणाने नियमांचे पालन करुन साजरे करण्यात आले. तर काहींनी घरातील मंडळींसोबत राहणं पसंत केले. मात्र, आता येणाऱ्या नवीन वर्षाकडून खूप काही अपेक्षा आहेत. कारण येणाऱ्या वर्षात अनेकांनाची एकच अपेक्षा आणि इच्छा आहे ती म्हणजे जग कोरोनामुक्त व्हाव.

मुंबईच्या समुद्रकिनारी तुरळक गर्दी

वर्षाचा शेवटचा दिवस हा अनेकांकडून फटाक्यांची आतषबाजी, पार्टी, मज्जा, मस्ती करुन सरत्या वर्षाला निरोप दिला जातो. पण, यंदाच्या सरत्या वर्षात म्हणजेच २०२० हे वर्ष पूर्णपणे कोरोना महामारीत गेले. त्यामुळे नागरिक आधीच कोलमडून गेला होता. त्यामुळे यंदाच्या शेवटच्या वर्षात तसा उत्साह मुंबईकरांकडून दिसला नाही. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ५ जानेवारीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी देखील त्या नियमांचे पालन करून ११ वाजण्याच्या पूर्वी सरत्या वर्षाला निरोप दिला. त्यामुळे मुंबईच्या समुद्र किनारी तुरळक गर्दी पाहायला मिळाली.

मुंबईकरांनी केले नियमांचे पालन

वरळी, वांद्रे येथील समुद्रकिनारी आलेल्या अनेक मुंबईकरांनी तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या नियमांचे पालन करुन सरत्या वर्षाला निरोप दिला. मुंबईकरांशी ‘आपलं महानगर’ने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, हे वर्ष तर कोरोना काळात निघून गेले. पण, येणारे वर्ष कोरोनामुक्त असावे.

- Advertisement -

चोख पोलीस बंदोबस्त

कोरोना साथीचा आजार रोखण्यासाठी तसेच खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने राज्यातील प्रमुख शहरामध्ये नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. संचारबंदी आणि राज्य शासनाच्या नियमाचे आदेश मोडणाऱ्यावर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -