घरदेश-विदेशदिल्ली विमानतळावर पॉवर बँकचा स्फोट

दिल्ली विमानतळावर पॉवर बँकचा स्फोट

Subscribe

पॉवर बँकच्या स्फोटानंतर दिल्ली विमानतळावर खळबळ उडाली होती. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पॉवर बँक बॅगेतून काढायला सांगितलेल्याने चिडलेल्या महिलेने जमिनीवर फेकून दिला. त्यानंतर पॉवर बँकचा स्फोट झाला.

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पॉवर बँकचा स्फोट झाला. या स्फोटाप्रकरणी ५५ वर्षाच्या मालविका तिवारी या अभिनेत्रीला अटक करण्यात आली होती. मात्र जामिनावर तिची सुटका करण्यात आली आहे. मालविका तिवारी यांची बॅग सुरक्षा कर्मचारी तपासत होते. दरम्यान त्याच्या बँगेमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांना पॉवर बँक सापडला. त्यांनी मालविका यांना पॉवर बँक बाहेर काढण्यास सांगितले. मालविका यांनी चिडून पॉवर बँक जमिनीवर फेकून दिला. त्यानंतर विमानतळावर या पॉवर बँकचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली.

मंगळवारी दिल्ली विमानतळावर ही घटना घडली आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बॅग तपासणी दरम्यान मालविका यांना पॉवर बँक बॅगेतून बाहेर काढण्यास सांगितला. मालविका यांना चिडून पॉवर बँक जमिनीवर फेकून दिला. त्यानंतर विमानतळावर पॉवर बँकचा स्फोट होऊन आवाज आला. त्यामुळे विमानतळावर असणाऱ्या प्रवाशांमध्ये काही काळ भितीचे वातावरण पसरले होते. या स्फोटामध्ये कोणीही जखमी झाले नाही. या घटनेनंतर अभिनेत्री मालविका तिवारी हिला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र काही वेळानंतर जामीनावर तिची सुटका करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -