घरक्राइमबोगस कागदपत्रांच्या आधारे कारची विक्री करुन बँकेची फसवणूक; ७ जणांना अटक

बोगस कागदपत्रांच्या आधारे कारची विक्री करुन बँकेची फसवणूक; ७ जणांना अटक

Subscribe

बोगस कागदपत्रांच्या आधारे बँकेसह इतरांची फसवणूक करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

बोगस कागदपत्रांच्या आधारे बँकेतून महागड्या कारसाठी कर्ज घेऊन कारची परस्पर इतरांना विक्री करुन बँकेची फसवणूक करणार्‍या सातजणांच्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. धरमवीर आमीर शर्मा ऊर्फ वसीम नजीमउद्दीन शेख ऊर्फ भास्कर गौडा ऊर्फ धरम, मृगेश महालिंगम नवीधर, साईनाथ व्यकंटेश गंजी ऊर्फ संदीप बोराटे ऊर्फ साई, प्रदीप रामशिरोमणी मौर्या, दिलशाद आलम बद्रुजमान अन्सारी, विजयकुमार कृष्णप्रताप वर्मा आणि सलाम इस्लाम खान अशी या सातजणांची नावे आहेत. या टोळीकडून पोलिसांनी १९ महागड्या कार हस्तगत केल्या असून या कारची किंमत सुमारे साडेपाच कोटी रुपये आहे.

कारची परस्पर विक्री करुन बँकेची फसवणूक

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तक्रारदारांना संबंधित आरोपींनी बोगस कागदपत्रांच्या आधारे दोन कारची विक्री केली होती. या दोन्ही कारचा व्यवहार सुमारे १० लाख रुपयांमध्ये झाला होता. नंतर त्यांना या कारवर बँकेचे कर्ज असल्याचे समजले होते. या आरोपींनी कर्ज घेतलेल्या कारची परस्पर विक्री करुन त्यांच्यासह बँकेची फसवणूक केली. हा प्रकार नंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश साईल यांना समजताच त्यांनी त्याची शहानिशा सुरु केली. चौकशीत अशाच प्रकारे बँकेतून कर्ज काढून महागड्या कार खरेदी करुन नंतर याच कारची बोगस कागदपत्रांच्या आधारे मुंबईसह इतर राज्यात विक्री करणारी एक टोळी असल्याचे उघडकीस आले. हा प्रकार उघडकीस येताच बुधवारी १३ जानेवारीला संबंधित आरोपीविरुद्ध कुर्ला पोलीस ठाण्यात बोगस दस्तावेज बनवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता.

- Advertisement -

साडे पाच कोटींच्या १९ महागड्या कार जप्त

गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेच्या चेंबूर युनिटकडे सोपविण्यात आला. आरोपींचा शोध सुरु असतानाच ठाणे येथील वागळे इस्टेट, ज्ञानेश्वर नगर परिसरातून धरमवीर, मृगेश आणि साईनाथ या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी इतर चार आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. पोलीस तपासात या टोळीने मुंबईतील विविध नामांकित बँकेत महागड्या कारसाठी कर्ज घेतले होते. त्यासाठी बोगस दस्तावेज बनविले होते. कर्ज मंजूर होताच कार खरेदी करुन त्याची परस्पर मुंबईसह इतर राज्यात विक्री केली होती. या टोळीकडून पोलिसांनी दोन ऑडी, एक मिनी कूपर्स, एक फोर्ट, एक टोयोटो फॉरट्यून, टोयोटा इनोव्हा क्रिस्टन, एमजी हेक्टर, तीन हुंडाई क्रिटा, महिंद्रा एक्सयूव्ही ३००, दोन मारुती सियाज, एक मारुती सुझीकी, अशा नामांकित कंपन्यांच्या १९ महागड्या कार जप्त केल्या आहेत.

या कारची किंमत ५ कोटी ६१ लाख ८१ हजार रुपये इतकी आहे. या कारचे बोगस आर बुक तयार करण्यासाठी लागणारे स्मार्टकार्ड त्यांनी अ‍ॅमेझॉन या वेबसाईटवरुन प्राप्त केले होते. या टोळीने बोगस कागदपत्रांच्या आधारे आतापर्यंत अनेकांची तसेच नामांकित बँकेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत सर्वजण पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  सावधान! ऑनलाईन शॉपिंग करणे पडले महागात; २२ हजार ग्राहकांची केली फसवणूक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -