घरमहाराष्ट्रअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री भुजबळ

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री भुजबळ

Subscribe

उपाध्यक्षपदी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि कृषीमंत्री दादा भुसे यांच्या नावाची घोषणा

नाशिकमध्ये मार्च महिन्यात होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे नाव जाहीर करण्यात आले. संमेलनाच्या उपाध्यक्षपदी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि कृषीमंत्री दादा भुसे यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात २७, २७ आणि २८ मार्च रोजी हे साहित्य संमेलन होणार आहे.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी कॉलेजमधील संमेलनाच्या कार्यालयात सोमवारी सकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही नावे जाहीर करण्यात आली. लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले यांनी स्वागताध्यक्षपदी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा केली. स्वागत समिती गठीत करण्यात आली आहे.

- Advertisement -

जाहीर झालेली नावे अशी –

संमेलनाध्यक्ष – डॉ. जयंत नारळीकर

स्वागताध्यक्ष – पालकमंत्री छगन भुजबळ

- Advertisement -

उपाध्यक्ष – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषीमंत्री दादा भुसे, डॉ. मो. स. गोसावी, प्रा. प्रशांत पाटील

कार्याध्यक्ष – हेमंत टकले, अॅड. विलास लोणारी

निमंत्रक – लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर

सल्लागार समिती – महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, जिल्हा परिषद सीईओ लीना बनसोड, महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायूनंदन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -