घरट्रेंडिंगRecruitment: Reliance JIO,Indian Oil मध्ये नोकरी करायची आहे? वाचा सविस्तर

Recruitment: Reliance JIO,Indian Oil मध्ये नोकरी करायची आहे? वाचा सविस्तर

Subscribe

या पदांसाठी इच्छिक उमेदवार करु शकता अर्ज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकं बेरोजगार झालेत. तर काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात देखील केली. मात्र बेरोजगार किंवा जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी Reliance jio आणि Indian Oil मध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. भारतात सर्वात मोठी, नावलौकिक असणारी टेलीकॉम कंपनी अर्थात रिलायन्स जिओने वेगवेगळ्या पदांकरता भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या कंपनीत होणाऱ्या भरती प्रक्रियेत अनुभवी किंवा फ्रेशर्स उमेदवारांनादेखील अर्ज करता येणार आहे. रिलायन्स जिओने २०० हून अधिक जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. जिओ या कंपनीने https://careers.jio.com वर याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे.

या वेबसीईटवर जिओ कंपनीने पदसंख्या, पद आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पाहता येईल. होम सेल्स ऑफिसर, चॅनल सेल्स लीड, इंटरप्राइज सेल्स ऑफिसर, कस्टमर सर्व्हिसेस, इंजीनिअरिंग अ‌ॅण्ड टेक्नॉलॉजी, एचआर अ‌ॅण्ड ट्रेनिंग ऑपरेशन्स अशा क्षेत्रात वेगवेगळ्या पदांसाठी चेन्नई विभागासाठी अर्ज मागवले आहे. तर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ज्युनिअर असिस्टंट-४ या पदासाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. याविषयी IOCL ने परिपत्रक काढले असून आपल्या iocrefrecruit.in या वेबसाईवर भरती प्रक्रियेविषयी माहिती दिली आहे. IOCL एकूण १६ ज्युनियर इंजीनियर असिस्टंट -४ पदासाठी भरती प्रक्रिया राबवत आहेत. इच्छुक उमेदवार १९ फेब्रवारी २०२१ पर्यंत त्यासाठी अर्ज करु शकतात. अर्ज प्रक्रिया पार पाडल्यानंतर ज्युनियर इंजीनियर असिस्टंट -IV (प्रोडक्शन) या पदासाठी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. एकूण १६ जागांपैकी ९ जागा खुला प्रवर्ग, ४ जागा ओबीसी प्रवर्ग, २ जागा एसी प्रवर्ग आणि एक जागा आर्थिकदृष्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित आहेत.

- Advertisement -

आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • ज्युनियर इंजीनियर असिस्टंट या पदासाठी अर्ज करण्यासाठी केमिकल/रिफाईनरी अ‌ॅण्ड पेट्रोकेमिकल या क्षेत्रात तीन वर्षांचा डिप्लोमा केलेला असणे आवश्यक
  • बीएससी (Maths, Physics, Chemistry or Industrial Chemistry) केलेल्या उमेदवारांनासुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतात
  • खुला प्रवर्घ तसेच EWS च्या उमेदवारांसाठी कमीत कमी ५० टक्क्यांच्या गुणांची अट तर एससी/एसटीसाठी ही मर्यादा ४५ टक्के आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर अर्जाची हार्ड कॉपी डेप्यूटी जनरल मॅनेजर (एचआर), बरूनी रिफाइनरी, पीओ- बरूनी ऑयल रिफाइनरी, बेगुसराय बिहार या पत्त्यावर पाठवावा लागेल. अर्ज पाठवण्याची अंतिम तारिख २७ फेब्रुवारी २०२१ आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -