घरदेश-विदेशदिल्ली, उत्तराखंड, युपी सोडून शेतकर्‍यांचा आज देशभर चक्काजाम

दिल्ली, उत्तराखंड, युपी सोडून शेतकर्‍यांचा आज देशभर चक्काजाम

Subscribe

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर दोन महिन्यांपेक्षाही जास्त दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्याप यावर तोडगा निघाला नसल्याने आता शेतकरी संघटनांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी देशभरात चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. मात्र, दिल्लीसह उत्तर प्रदेश व उत्तराखंड येथे उद्या चक्काजाम होणार नसल्याचे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितले.

राकेश टिकैत म्हणाले, जे शेतकरी येथे येऊ शकले नाहीत, ते आपआपल्या ठिकाणी शांततेत चक्काजाम करतील, हा चक्काजाम दिल्लीत होणार नाही. तसेच, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये देखील चक्काजाम आंदोलन केले जाणार नाही. दिल्ली सोडून देशाच्या अन्य भागातील रस्ते बंद केले जातील, असे टिकैत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

शेतकरी नेत्यांकडून राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना राकेश टिकैत म्हणाले, यावेळचा चक्काजाम केवळ तीन तास (दुपारी १२ ते ३) या वेळेत होईल. या काळात शेतकरी आपआपल्या भागांमधील रस्ते जाम करतील आणि रस्त्यांवर बसून विरोध दर्शवतील. तीन तासांनंतर आंदोलकांकडून गाव, ब्लॉक, जिल्हास्तरावर स्थानिक अधिकार्‍यांना निवेदन दिले जाईल.

दिल्ली पोलिसांनी याबाबत सांगितले की, चक्काजामबाबत आमच्याशी कोणत्याही नेत्याने संपर्क साधलेला नाही. मात्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणामधील पोलीस याबाबत अधिक गंभीर आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -