घरताज्या घडामोडीCM पालघर दौरा : मुख्यमंत्र्यांचा हेलिकॉप्टर टेक ऑफसाठी 'राजभवन'ला बायपास

CM पालघर दौरा : मुख्यमंत्र्यांचा हेलिकॉप्टर टेक ऑफसाठी ‘राजभवन’ला बायपास

Subscribe

ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील मानापमान नाट्यातील आणखी एक एपिसोड पहायला मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या नियोजित अशा पालघर दौऱ्यासाठी राजभवनाएवजी थेट महालक्ष्मीचे रेसकोर्सने प्रवासाची सुरूवात करण्याचा निर्णय़ घेतला. त्यामुळेच राजभवनातील हेलिपॅडचा वापर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सोयीस्कररीत्या टाळले. मुख्यंमंत्र्यांना सोयीचा असा दक्षिण मुंबईतील हेलिपॅडचा वापर करणे शक्य होते. मात्र गुरूवारी राज्यपालांच्या उत्तराखंड दौऱ्यामुळे घडलेले नाट्य पाहता राजभवनातून प्रवासाला मुख्यमंत्र्यांनी सोयीस्कररीत्या बगल दिल्याचे आज समोर आले. महालक्ष्मी रेसकोर्सचा वापर करत मुख्यमंत्री सकाळीच पालघरच्या दिशेने हेलिकॉप्टरने रवाना झाले. त्यामुळे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील वादाचा आणखी एक एपिसोड यानिमित्ताने पहायला मिळाला आहे.

- Advertisement -

असा आहे मुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा

भाजपची ताकद असणाऱ्या पालघरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा असणार आहे. पालघरमध्ये सध्या सुरू असलेले विकास प्रकल्प आणि आढावा बैठकांसाठी मुख्यमंत्री आज पालघर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री स्थानिकांनी विकसित करणाऱ्या पर्यटन स्थळांनाही भेट देणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेत तयार करण्यात आलेल्या घरांचीही पाहणी मुख्यमंत्री करतील.

कसा आहे घटनाक्रम

मुख्यमंत्र्यांचा आज शुक्रवारी नियोजित असा पालघर दौरा होता
दौऱ्यासाठी दक्षिण मुंबईतला राजभवनचा पर्याय मुख्यमंत्र्यांना तुलनेने जवळचा होता
पण मुख्यमंत्र्यांनी राजभवनाचे हेलिपॅड वापरणे सोयीस्करपणे टाळले
मुख्यमंत्री कार्यालयाने टेकऑफसाठी महालक्ष्मी रेसकोर्सची जागा निश्चित केली
मुख्यमंत्र्यांनी दक्षिण मुंबईतून महालक्ष्मी रेसकोर्स गाठले
पालघर दौऱ्यासाठी रवाना झाले
जव्हार तालुक्यात मुख्यमंत्री दाखल झाले
भाजपची ताकद असलेल्या जव्हार तालुक्यात मुख्यमंत्र्यांचा दौरा

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -