घरदेश-विदेशशरद पवारांच्या नाराजीवर संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवारांच्या नाराजीवर संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

मी माझ्या शासकीय कामकाजाला सुरुवात करत आहे.

पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडकलेले चर्चेत असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी सोमवारी (२३ फेब्रुवारी) पोहरादेवी मंदिरात आले होते. तब्बल १५ दिवसानंतर वनमंत्री संजय राठोड जनतेसमोर आले यावेळी पोहरादेवी परिसरात बंजारा समाजाच्या समर्थकांनी तोबा गर्दी करत शक्तीप्रदर्शन केले होते. याच शक्तीप्रदर्शनावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार नाराज असल्याचे बोलल्या जात आहे. यावर वनमंत्री संजय राठोड यांनी शरद पवारांच्या नाराजीवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मी जे काही बोलायचे आहे ते काल बोललो आहे. तसेच पवारांच्या नाराजीबाबत मला काही बोलाचे नाही असे म्हणत संजय राठोड मुंबईकडे रवाना झाले आहेत.

वनमंत्री संजय राठोड आज(मंगळवार,२४ फेब्रुवारी) राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड सकाळीच यवतमाळहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी त्यांना शक्तीप्रदर्शनावरुन शरद पवार नाराज झाले असल्याचे विचारले यावर वनमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, शरद पवार यांच्या नाराजीबाबत मला काही वक्तव्य करायचे नाही. मला जे काही बोलायचे ते काल बोललो आहे. तसेच काल सांगितल्याप्रमाणे मी माझ्या शासकीय कामकाजाला सुरुवात करत आहे. त्यासाठी आज मी राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीसाठी मुंबईला जात असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : पामेला ड्रग्ज प्रकरणी भाजप नेत्याला अटक, पोलिसांची धडक कारवाई


मूळची बीडची असलेल्या पूजा चव्हाणने पुण्यातील राहत्या घराच्या इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. परंतु पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर काही कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. यामध्ये वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेण्यात आले आहे. यामुळे वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पूजाच्या आत्महत्येनंतर तब्बल १५ दिवसांनी वनमंत्री संजय राठोड जनतेसमोर आले यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज झाले असल्याची चर्चा सुरु आहे. शरद पवारांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे वनमंत्री संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. परंतु मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत राठोडांच्या समर्थकांनी तोबा गर्दी केली होती. यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच शक्तीप्रदर्शनावरुन शरद पवार नाराज झाले असल्याचे समजते आहे.


हेही वाचा : पोहरादेवी गर्दीप्रकरणी आपला माणूस असेल तरी कारवाई होणार – संजय राऊत


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -