घरट्रेंडिंग'या' देशात मिळतेय सोन्याची महागडी बिर्याणी, जाणून घ्या किंमत

‘या’ देशात मिळतेय सोन्याची महागडी बिर्याणी, जाणून घ्या किंमत

Subscribe

नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी बिर्याणी हा अत्यंत जवळचा पदार्थ. अनेकजण दूर-दूर ठिकाणी प्रसिद्ध बिर्याणी खाण्यासाठी जात असतात. मात्र अशी एक सर्वात महागडी नॉन व्हेज बिर्याणी साऱ्यांनाच खावीशी वाटेल आहे. जगातील सर्वात महागडी बिर्याणी म्हणून या बिर्याणीला ओळखले जात आहे. ही बिर्याणी सर्वात महागडी यासाठी ठरत आहे कारण यात चक्क २३ कॅरेट गोल्ड वापरण्यात आले आहे. असे गोल्ड की जे तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे या अप्रतिम बिर्याणीला जगातील सर्वात महाग बिर्याणीचा किताब दिला जात आहे. या बिर्याणीचे नाव ‘द रॉयल गोल्ड बिर्याणी’ असे आहे. ही बिर्याणी कुठे मिळते असा तुम्हाला प्रश्न पडाला असेल, तर ही बिर्याणी श्रीमंतीत लोळण घेणाऱ्या दुबईत मिळतेयं.

दुबईच्या इंटरनॅशनल फायनान्स सेंटरमधील बॉम्बे बॉरो (Bombay Borough) या रेस्टॉरंटने ही खास सोन्याचा मखमला असलेली ‘रॉयल गोल्ड बिर्याणी’ लॉन्च केली आहे. भारतीय रुपयांमध्ये या बिर्याणीची किंमत तब्बल २० हजार रुपये आहे. सोन्याची भव्य थाळीमध्ये सजवाट केल्या या बिर्याणीमध्येही सोन्याचा मखमला असलेले पदार्थ देण्यात आले आहे. त्यामुळे ही २० हजारेंचे सोने असलेली बिर्णायी खाता येईल अशी आहे. ‘द रॉयस गोल्ड’ बिर्याणीची खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला आवडत्या तांदुळाची निवड करु ही बिर्याणी बनवून घेऊन शकतात. तसेच त्यातही खिमा बिर्याणी, बिर्याणी राईस, सफेद केसरी राईस असे तुम्हाला आवडेल अशा कोणत्याही पद्धतीने ही बिर्याणी तुम्ही ऑर्डर करु शकता. यासोबत तुम्हाला बेबी पोटॅटो, उकडलेली अंडी, रोस्टेड काजू, डाळिंब अशी महागडे पदार्थ यात वापरण्यात आले आहे. यात एकूण ३ किलोचा तांदुळ बनवण्यासाठढी वापरत असल्याने ही बिर्याणी एकट्याने खाणे अधिक अवघड असते. त्यामुळे खाण्यासाठी दिलखुलास पैसा खर्च करणाऱ्या खवय्यांसाठी ही जागा बेस्ट ठरत आहे. जर तुम्हालाही ही महागडी सोन्याची बिर्याणी खायची असल्याल दुबईला जावे लागले.

- Advertisement -

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -