घरताज्या घडामोडी'सेक्रेड गेम्स' फेम झोयाच्या घरात अज्ञाताने घुसण्याचा केला प्रयत्न, करत होता गर्लफ्रेंड...

‘सेक्रेड गेम्स’ फेम झोयाच्या घरात अज्ञाताने घुसण्याचा केला प्रयत्न, करत होता गर्लफ्रेंड असल्याचा दावा

Subscribe

बहुचर्चित वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स’मध्ये प्रमुख भूमिकेत असलेली अभिनेत्री एल्नाज नौरोजीच्या घरामध्ये एक व्यक्ती घुसण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर एल्नाजने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. त्यामुळे आता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अभिनेत्री एल्नाज नौरोजीने वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स’मध्ये प्रमुख भूमिका निभावली आहे. याशिवाय काही वेबसीरिज आणि चित्रपटात काम केले आहे.

अलीकडेच ती गोव्यात एका मित्राच्या घरी थांबली होती. यादरम्यान एका व्यक्तीने तिच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. एल्नाज गोवामध्ये आहे आणि ती सतत शूटिंग करत आहे. त्यामुळे एल्नाजने मित्रांच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला. यावेळी एक व्यक्ती तिच्या सुरक्षारक्षकाला चकमा देऊन जबरदस्तीने घरात घुसला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Elnaaz Norouzi (@_iamelnaaz_)

- Advertisement -

माहितीनुसार, तो व्यक्ती दिल्लीहून आला होता आणि त्याला आता अटक करण्यात आली आहे. एल्नाजने याबाबत सांगितले की, ‘मी गोव्यामध्ये एका प्रोजेक्टवर काम करत होती. त्यावेळेस मी काही दिवसांसाठी माझ्या मित्राच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या मित्रांच्या घरातून एक फोटो देखील शेअर केला होता. जेव्हा आम्ही रात्री गच्चीवर मित्राचा वाढदिवस साजरा करत होता. त्यावेळेस मी थकली असल्यामुळे रुमवर परतली आणि आईसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत राहिली. तेव्हा मी खिडकीतून पाहिले की, कोणती तरी माझ्या घराचा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करत आहे. मी तेव्हा माझ्या मित्राला मेसेज केला की, तुम्ही कोणाला पाठवले आहे का? त्यावेळेस त्यानंतर उत्तर नाही म्हणून आले. दरम्यान तो व्यक्ती गच्चीवर सुरू असलेल्या पार्टीमध्ये सर्वांना मी त्यांची गर्लफ्रेंड असल्याचे सांगू इच्छित होता. त्याच रात्री त्या व्यक्तीला ताब्यात घेतले गेले. यामुळे माझ्या मित्रांना पूर्ण रात्र अंजुना पोलीस स्टेशनमध्ये काढावी लागली. जर माझे मित्र वेळेत आले नसते तर परिस्थिती आणखी गंभीर झाली असती. ही घटना झाल्यानंतर मी पूर्ण रात्र झोपू शकली नाही.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Elnaaz Norouzi (@_iamelnaaz_)

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्राचे भावजी आदेश बांदेकरांच्या मुलाचे अभिनयात पदार्पण


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -