घरक्रीडाजसप्रीत बुमराहची होणारी पत्नी कोण? अखेर उत्तर मिळालेच  

जसप्रीत बुमराहची होणारी पत्नी कोण? अखेर उत्तर मिळालेच  

Subscribe

विवाह सोहळा १४-१५ मार्चला गोव्यात होणार अशी चर्चा आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच कसोटी मालिका पार पडली. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने या मालिकेच्या चौथ्या कसोटीतून माघार घेतली होती. त्याने वैयक्तिक कारण असल्याचे सांगत या कसोटीत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. हे वैयक्तिक कारण म्हणजे बुमराह लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मात्र, त्याची होणारी पत्नी कोण? असा चाहत्यांना प्रश्न पडला होता. दक्षिणेतील चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्याशी बुमराह लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, अनुपमाच्या आईने या वृत्ताचे खंडन केले. त्यामुळे चाहते थोडे गोंधळात पडले होते. मात्र, आता बुमराहची पत्नी कोण? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. बुमराह स्पोर्ट्स अँकर आणि मॉडेल असणाऱ्या संजना गणेशनशी विवाहबंधनात अडकणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjana Ganesan (@sanjanaganesan)

- Advertisement -

कोण आहे संजना गणेशन?

बुमराह आणि संजना १४-१५ मार्चला गोव्यात विवाह करतील अशी चर्चा आहे. संजना एक स्पोर्ट्स अँकर आहे. बीसीसीआयच्या एका पुरस्कार सोहळ्यात संजनाने बुमराहची मुलाखत घेतली होती. आता याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुण्यात जन्मलेली संजना एमटीव्हीच्या स्प्लिट्सविला या कार्यक्रमातून टीव्हीवर पहिल्यांदा झळकली होती. त्यानंतर तिने मॉडेलिंग केले, तसेच स्पोर्ट्स अँकर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तिने क्रिकेट, बॅडमिंटन आणि फुटबॉलसह अनेक इव्हेंट्स होस्ट केले आहेत. ती आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचा कार्यक्रम ‘नाइट क्लब’ची देखील होस्ट आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -