घरदेश-विदेशCovid19: 'या' ९ जिल्ह्यात कोरोनाचं थैमान! महाराष्ट्रासह पंजाबमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक

Covid19: ‘या’ ९ जिल्ह्यात कोरोनाचं थैमान! महाराष्ट्रासह पंजाबमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक

Subscribe

देशात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्ह्यांत सर्वाधिक कोरोनाबाधित असून हे ९ जिल्हे एकट्या महाराष्ट्रात आहेत, अशी माहिती बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. महाराष्ट्रातील या ९ जिल्ह्यात पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगावसह अकोल्याचा देखील समावेश आहे. दरम्यान, या ९ जिल्ह्यांपैकी महाराष्ट्र कोरोनाबाधितांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत, केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले की, महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यात सातत्याने कोरोना बाधितांचा आकडा वाढता असून ही चिंताजनक बाब आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात कोरोना व्हायरसच्या २८ हजारांहून अधिक बाधितांची नोंद करण्यात आली आहे तर पंजाबमध्ये एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वाधिक आकडा हा नव्या कोरोना बाधितांचा आहे. यासह त्यांनी असेही सांगितले की, पंजाब आणि महाराष्ट्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांसह बैठक देखील करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी यासंदर्भात माहिती देताना भारतात सध्या ३ लाख ६८ हजार ४५७ अॅक्टिव्ह रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळल्याने या १० जिल्ह्याने आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण केले आहे. तर यासह १ एप्रिलपासून ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना देखील कोरोना लसीकरण लवकरच करण्यात येणार असल्याचा सरकारने घेतला आहे. हा निर्णय घेण्यामागे सरकारने त्याचे कारण सांगताना असे म्हटले की, देशात कोरोना व्हायरसने बळी गेलेल्यांची एकूण टक्केवारी ८८% असून त्यात ४५ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक असणाऱ्या लोकांचा प्राण कोरोनाने गेला आहे.


Coronavirus Vaccination: ४५ वर्षांवरील सर्वांना लस मिळणार; लसीकरणासाठी अशी करा नोंदणी

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -