घरमनोरंजन'शोले'मधील 'जब तक है जान' गाण्यावर इराणी महिलेचा तुफान डान्स , व्हिडीओ...

‘शोले’मधील ‘जब तक है जान’ गाण्यावर इराणी महिलेचा तुफान डान्स , व्हिडीओ व्हायरल

Subscribe

व्हिडीओ मध्ये शोले चित्रपटातील संपूर्ण सीनच तयार केला गेला आहे. वीरुला दोरीने बांधण्यात आलं आहे. तसेच गब्बर हातात नकली बंदूक घेऊन बसंतीच्या डान्सचा आनंद घेत आहे.

क्लासिकआणि अॅक्शन सिनेमा म्हटलं की शोले या चित्रपटाच नाव घेतल जात. या चित्रपटातील डायलॅाग्ज, कलाकार,सीन्स प्रत्येक गोष्ट चाहत्यांच्या आजही लक्षात आहेत. शोले चित्रपटाची क्रेज भारतापुरतीच मर्यादीत न राहता जगभरात पोहचली आहे. सध्या सोशल मिडीयावर शोले चित्रपटातील ”जब तक हे जान जाने जहाँ”  या गाण्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. एका पार्टी दरम्यान ईरानी महिला ”जब तक हे जान जाने जहाँ” या गाण्यावर थिरकतांना दिसतेय. इतकेच नाही तर तिच्या सोबत जय आणि वीरु देखील आहेत.

- Advertisement -

व्हिडीओ मध्ये शोले चित्रपटातील संपूर्ण सीनच तयार केला गेला आहे. वीरुला दोरीने बांधण्यात आलं आहे. तसेच गब्बर हातात नकली बंदूक घेऊन बसंतीच्या डान्सचा आनंद घेत आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे. तसेच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव देखील होत आहेत. १९च्या काळातील अनेक गाण्यांचा प्रभाव आजही लोकांमध्ये दिसून येतो.अनेक जून्या गाण्यांचे रिमीक्स वर्जन आजची तरुणाई गुणगुणताना दिसते. ‘शोले’ या चित्रपटातील अनेक गाणी हीट झाली तसेच हेमा मालिनी वर चित्रीत करण्यात आलेलं हे गाण ‘जब तक हे जान जाने जहाँ’ हे सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी गायल आहे.

रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले हा चित्रपट  १९७५ साली भारतामधील हिंदी भाषिक चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी मानला गेलेला चित्रपट आहे.अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, संजीव कुमार व अमजदखान यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या .चित्रपटातील प्रत्येक पात्रांनी आपल्या कलागुणांची भर टाकून प्रत्येक पात्र अजरामर केल आहे.आजही चाहत्यांच्या मनात आपलं स्वतंत्र असं स्थान निर्माण केल आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – बॉबी देओलला २४ वर्षा आधीच लागली होती कोरोनाची चाहूल

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -