घरलाईफस्टाईलसावधान: दैनंदिन आहारातील 'या' खाद्यपदार्थांमुळे होऊ शकते रोगप्रतिकार शक्ती कमी

सावधान: दैनंदिन आहारातील ‘या’ खाद्यपदार्थांमुळे होऊ शकते रोगप्रतिकार शक्ती कमी

Subscribe

व्यायाम, प्राणायम करण्या बरोबरच योग्य आहारचे देखील महत्व आहे.

जगभरामध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी अनेक कडक निर्बंध शासनातर्फे लागू करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरस पासून बचावासाठी रोगप्रतीकार शक्ती वाढवणे किंवा मजबूत करणे हे अत्याधीक महत्वाचे आहे. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अनेक उपाय देखील करण्यात येत आहेत. रोगप्रतीकार शक्ती वाढवण्यासाठी योग्य व्यायाम, प्राणायम करण्या बरोबरच योग्य आहारचे देखील महत्व आहे. पण आपण करत असणारा आहार योग्य आहे की नाही किंवा कोणत्या खाद्यपदार्थमुळे आपली रोगप्रतीकार शक्ती कमकुवत होऊ शकते हे जाणून घेऊया.

- Advertisement -

कैफीन – काही लोकांना कॉफी पिणे खूप आवडते. पण त्यांच्या या आवडीचे रूपांतर कधी सवयीत होते हे त्यांना देखील समजत नाही. ते पुर्णपणे कॉफी पिण्याच्या आहारी जातात. कॉफीमध्ये आढळणार्‍य कैफीन या घटकामुळे शरीराच्या रोगप्रतीकार शक्ती
वर थेट परिणाम होतो. यामुळे कॉफी पिण्यावर मर्यादा आखणे गरजेचे आहे.

फास्ट फूड – खायला चमचमीत लागणारे फास्ट फूड हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत. फास्ट फूड मध्ये साखरेचा वापर केला जातो तसेच यात फायबर ची मात्र खूप कमी असते आपल्या शरीरसाठी फायबर हे महत्वाचे घटक आहे यामुळे फास्ट फूड खाल्यावर आपल्या शरीराला नुकसान होते. तसेच हळू-हळू रोगप्रतीकार शक्ती कमी होऊ लागते.

- Advertisement -

धूम्रपान आणि मद्यपान – जे व्यक्ती धूम्रपान आणि मद्यपान याचे सेवन अधिक प्रमाणात करतात त्या लोकांमध्ये रोगप्रतीकार शक्ती कमकुवत असल्याचे पाहायला मिळते. म्हणून धूम्रपान आणि मद्यपान यापासून शक्य तितके दूर रहावे.

प्रोसेस्ड मीट (मांस ) – प्रोसेस्ड मीट म्हणजेच प्रक्रिया केलेलं मांस हे शरीरासाठी घातक असल्याचे सांगण्यात येते. प्रोसेस्ड मीटच नाही तर इतर प्रोसेस्ड पदार्थ खाल्ल्यास शरीरातील रोगप्रतीकार शक्ती वर विपरीत परिणाम होऊ शकतो.

तेल – जर तुम्ही जेवणा मध्ये एकाच तेलाचा वापर वारंवार करत असणार तर हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. परत -परत वापरण्यात आलेल तेल हे तुमची रोगप्रतीकार शक्ती कमकुवत करू शकते. तसेच तुम्हाला इतर आरोग्यीक समस्यांना सामोरे जावे लागेल . म्हणून जेवण बनवताना चांगल्या प्रकारच्या तेलाचा वापर करावा. आणि राहिलेले तेलाचा वापर इतर जेवणात पुन्हा वापर करणे टाळावे.

लोणच– जेवणाच्या ताटात हमखास वाढला जाणार पदार्थ म्हणजे लोणच. चटपटीत लोणच्यांचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. पण लोणच्यां मध्ये मुख्य प्रमाणात सोडियम आढळते जे डिहाइड्रेशन तसेच किडनी वर परिणाम करते.

अस्वच्छ पाणी – दैनंदिन जीवनात पाण्याचे महत्व हे खूप जास्त आहे. पाणी हे एका प्रकारे जीवन आहे. म्हणून आपण वापरत असलेले पाणी हे स्वच्छ आहे की नाही हे तपासून पाहणे गरजेचे आहे. अस्वच्छ पाण्याचा वापर आपली रोगप्रतीकार शक्ती बिघडवू शकतो.

सोडा – सोड्यामधे साखरेचे प्रमाण हे सर्वाधिक असते त्यामुळे शरीरातील इंसुलिन चे प्रमाण वाढवते तसेच रोगप्रतीकार शक्ती वर सुद्धा परिणाम करते. डायबीटीस असणार्‍या व्यक्तींसाठी सोडा पिणे अत्यंत अपायकरक आहे.

सीलबंद फळे – आजकाल बाजारात सीलबंद असणारी फळे विकली जातात. पण यामध्ये कोणत्याही प्रकारचा ताजेपणा नसून ते शरीरसाठी अपायकरक ठरते. यामुळे बाजार पेठेत मिळणारा कोणत्याही प्रकारच सीलबंद जेवण किंवा फळे विकत घेऊ नये.


हे हि वाचा – रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रोजच्या आहारात निवड करा ‘आठ’ खाद्यपदार्थांची

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -