घरCORONA UPDATEकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका चिमुकल्यांना, ८ महिन्यांची मुलं होतायत कोरोनाग्रस्त!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका चिमुकल्यांना, ८ महिन्यांची मुलं होतायत कोरोनाग्रस्त!

Subscribe

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने देशात (second wave of corona in india) थैमान घातलं आहे. आज देशात पहिल्यांदा २ लाखांहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनामुळे चिंता आणखी वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत फक्त वृद्ध नव्हे तर प्रत्येक वयोगटातील व्यक्ती कोरोनाचा शिकार होत आहेत. कोरोना ही दुसरी लाट कोणालाही धोका पोहोचवत आहे. देशातील चिमुकल्यांना या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसताना दिसत आहे. गेल्यावर्षी कोरोना लहान मुलांमध्ये कमी प्रमाणात पसरत होता. पण आता याचे प्रमाण वाढले आहे.

दिल्लीतल्या रुग्णालयामधील डॉक्टरांचे म्हणणे आहे की, त्यांच्या येथे ८ महिन्यांपासून ते १२ वर्षांपर्यंतची मुलं दाखल झाली आहेत, ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या मुलांमध्ये ताप आणि निमोनिया सारखी गंभीर लक्षणे दिसत आहेत. तर गुजरातमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी १५ टक्के मृत्यू तरुणांचे होत आहेत. गुजरातमधील सुरतमध्ये एका १४ दिवसाच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हरयाणामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ८ टक्के कोरोनाबाधित केसेस लहान मुलांची आहेत. तर गेल्या लाटेत हा आकडा १ टक्के होता. यापूर्वी असे म्हटले जात होते की, कोरोना मुलांना जास्त नुकसान पोहोचवत नाही. मुलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत होती. परंतु आता मुलांना जास्त सावध राहण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दिल्लीचे लोक नायक रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी सांगितले की, आमच्याकडे कोरोनाच्या गंभीर लक्षणांसोबत ८ मुलं रुग्णालयात दाखल करण्यात आली आहेत. यामध्ये एक मुलं ८ महिन्याचं आहे. उर्वरित १२ वयोगटातील आहेत. त्यांना तीव्र ताप, निमोनिया, अपचन आणि चव जाणे ही लक्षणे दिसत आहेत.

सर गंगाराम रुग्णालयतील डॉक्टरने सांगितले की, काही मुलांना कोरोनामुळे दाखल व्हावे लागत आहे. या व्यतिरिक्त वरिष्ठ बाल रोग विशेष तज्ज्ञ डॉ. धीरेन गुप्ता म्हणाले की, आजारी असलेल्या मुलांच्या कुटुंबियांकडून दररोज २० ते ३० फोन येतात.

- Advertisement -

कोरोनाबाधित मुलांवर उपचार करणे आव्हानात्मक

गुडगावचे फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्सिट्यूटचे बाल रोग विभागाचे संचालक आणि प्रमुख डॉ. कृष्ण चुघ यांनी सांगितले की, कोरोनाबाधित असलेल्या मुलांवरील उपचार हे वृद्धाच्या तुलनेत अधिक आव्हानात्मक आहेत. कोरोनाबाधित मुलांसाठी कोणतेही वेगळे बेबी वॉर्ड नाही बनवले आहेत. कारण गेल्या वर्षी कोरोनाबाधित मुलांच्या इतक्या केसेस आल्या नव्हता. आता उपचार करणे कठीण झाले आहे. रेमडेसिवीर किंवा स्टेरॉइड सारखी अँटी व्हायरल औषधं त्यांच्यासाठी वापर करू शकत नाहीत.

सुरतमध्ये १४ दिवसांच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू

गुजरातच्या सुरतमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. सुरतच्या न्यू सिव्हिल रुग्णालयात एका १४ दिवसांच्या मुलाचा मृत्यू कोरोनामुळे झाला. पण दुसऱ्याबाजूला त्या मुलांचा मृत्यू मल्टीपल ऑर्गन फेल झाल्यामुळे सांगितले जात आहे. तर सुरतमध्ये एका खासगी रुग्णालयात एका १४ दिवसाची मुलगी कोरोनाबाधित आढळली आहे आणि तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सध्या मुलीची प्रकृती गंभीर आहे.


हेही वाचा – Delhi Weekend Curfew: जाणून घ्या, काय राहणार सुरू आणि कशाला असणार बंदी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -