घरअर्थजगतCitiBank गुंडाळणार भारतासह १३ देशातील व्यवसाय

CitiBank गुंडाळणार भारतासह १३ देशातील व्यवसाय

Subscribe

सिटीबँक भारतासह १३ देशातील व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत आहे.

सिटी बँकच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती, म्हणजे आता सिटीबँक भारतासह १३ देशातील व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत आहे. सिटी बँकेने गुरुवारी घोषणा केली त्यात ते म्हणाले की, “भारत आणि चीनसह अजून १३ देशामधील कन्झ्युमर बिझनेस बँकिंग बंद करणार आहेत”. याबाबत त्यांनी सांगितले आहे की, “हा त्यांच्या ग्लोबल स्ट्रॅटेजीचा भाग आहे”.

देशात ३५ शाखा

सिटी बँकेच्या देशात ३५ शाखा आहेत. या सर्व शाखांमधील ग्राहक बँकिंग व्यवसायात सुमारे ४ हजार लोक काम करतात. या बँकेच्या ग्राहक बँकिंग व्यवसायात क्रेडिट कार्ड्स, रिटेल बँकिंग, गृह कर्जे आणि संपत्ती व्यवस्थापन यांचा समावेश आहे.

- Advertisement -

सिटी बँक व्यावसायिक स्पर्धेत कमी पडली

सिटी बँक ही १३ देशांमधील ग्राहक बँकिंग व्यवसायतून बाहेर पडली. याबाबत सिटी बँकेचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी जेन फ्रेझर यांनी या निर्णयाचे कारण सांगितले की, ‘त्यांच्या मते हा कंपनीच्या धोरणात्मक नितीचा भाग आहे. तसेच या निर्णयाचे महत्त्वाचे कारण म्हणजे या भागात व्यावसायिक स्पर्धेत बँक कमी पडली. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे.’

‘ग्राहक बँकिंग व्यवसायातून बाहेर पडण्यासाठी या प्रस्तावाला नियामक मान्यत मिळणे आवश्यक असते. तसेच या घोषणेमुळे आमच्या ऑपरेशनमध्ये कोणताही बदल होणार नाही. तसेच आमच्या सहकाऱ्यांवर देखील याचा कोणताही परिणाम होणार नाही. दरम्यान, आम्ही पूर्वीप्रमाणे आमच्या ग्राहकांची सेवा करत राहू’. – आशू खुल्लर, सिटी इंडियाचे मुख्य कार्यपालक अधिकारी

- Advertisement -

१९०२ मध्ये सिटी बँकेने ठेवले होते पाऊल

सिटी बँकेने १९०२ मध्ये भारतात पाऊल ठेवले होते. तर १९८५ साली या सिटी बँकेने ग्राहक बँकिंग व्यवसायात पाऊल ठेवले. संस्थात्मक बँकिंग व्यवसायाव्यतिरिक्त सिटी बँक मुंबई, पुणे, बंगळुरु, चेन्नई आणि गुरुग्राम या केंद्रातून जागतिक व्यवसायावर लक्ष केंद्रीत करेल. दरम्यान, सिटी बँकेला आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ४ हजार ९१२ कोटी रुपयांचा नफा मिळाला होता. तर आधीच्या वर्षात म्हणजेच २०१८-१९ या आर्थिक वर्षात ४ हजार १८५ कोटी नफा मिळाला होता.
सिटीबँक भारतासह १३ देशातील व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत आहे.


हेही वाचा – सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचं निधन


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -