घरताज्या घडामोडीनाशिकच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन लिकेज घटना दुर्दैवी, राज्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळणे गरजेचे...

नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन लिकेज घटना दुर्दैवी, राज्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळणे गरजेचे – फडणवीस

Subscribe

नाशिकमधल्या मृतांचा आकडा वाढला

नाशिकमधील महापालिकेच्या डॉ.झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळती झाल्यामुळे ११ ते २२ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन टाकी लिकेज झाल्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा बंद झाला यामुळे गंभीर असलेल्या रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. नाशिकमध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. राज्यात अशी स्थिती पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यायला पाहिजे. जे रुग्ण गंभीर आहेत अशांना तात्काळ मदत केली पाहिजे तसेच काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करायचे असल्यास त्यांना शिफ्ट केले पाहिजे, मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील आहोत. असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, नाशिकमधील ऑक्सिजन लिकेज होऊन रुग्णांचा मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे. याबाब सखोल चौकशी होत राहील परंतु राज्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. आता रुग्णालयात जे पेशंट आहेत त्यांना योग्य उपचार मिळणं गरजेचे आहे. तसेत कोणत्या रुग्णांना शिफ्ट करायचे असल्यास त्यांना लवकर केले पाहिजे. तसेच अशी घटना पुन्हा घडणार नाही याचीही काळजी घेतली जाईल. ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील आहोत तसेच त्यांच्यासाठी प्रार्थनाही करु असे विरोधी पक्षेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

नाशिक महापालिकेच्या डॉ, झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये दुपारी १२.३० च्या सुमारास ऑक्सिजन टाकी लिकेज झाली. ऑक्सिजन लिकेज झाल्याने रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना पुरवठा कमी पडू लागला तसेच नंतर पुरवठा खंडित झाला यामुळे रुग्णालयाती २२ रुग्ण तडफडून मृत्यूमुखी पडले. पाऊण तासात गळती रोखण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांना यश आले. दरम्यान, अचानक आलेल्या या संकटामुळे हॉस्पिटलमध्ये एकच हाहाकार उडाला. रुग्णांचे नातेवाईक हंबरडा फोडून रडत असल्याचे अतिशय विदारक चित्र हॉस्पिटलमध्ये पहायला मिळाले.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -