घरताज्या घडामोडीमैत्रीसाठी काय पण! Corona पॉझिटिव्ह मित्रासोबत १३०० किलोमीटरचा प्रवास करुन मिळवला ऑक्सिजन...

मैत्रीसाठी काय पण! Corona पॉझिटिव्ह मित्रासोबत १३०० किलोमीटरचा प्रवास करुन मिळवला ऑक्सिजन सिलेंडर

Subscribe

दोघांच्या मैत्रीची सर्वत्र कौतुक

देशात कोरोनाने सर्वांचेच आयुष्य बदलून टाकले. आपले कोण परके कोण याची अनेक उादहरणे या काळात आपल्याला पहायला मिळाली. कोरोनाने रक्ताची नाती तोडली मात्र अनेक मैत्रीची नाती आणखी घट्ट केली. अशाच एका मैत्रीचा आदर्श निर्माण करणारी एक घटना गाझियाबादमधून समोर आली आहे. मित्र कोरोना पॉझिटिव्ह आला. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मित्राला ऑक्सिजन मिळाले नाही. ऑक्सिजन मिळवण्यासाठी मित्राने आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना पॉझिटिव्ह मित्रासोबत तब्बल २४ तास १३०० किलोमीटर प्रवास केला. मित्राला ऑक्सिजन सिलेंडर मिळवून देऊन मित्राने मित्राचा जीव वाचवला. सध्या यांच्या मैत्रीची सर्वत्र कौतुक केले जात आहे.

देवेंद्र कुमार शर्मा आणि राजन हे दोघे बालपणीचे मित्र होते. दोघेही एकत्र शिकले व एकत्र लहानाचे मोठे झाले. देवेंद्र इनश्यूर्न्स कंपनीत आणि राजन आयटी सेक्टरमध्ये काम करत होता. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा एक मित्र संजिव सुमन याचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. ऑक्सिजन न मिळाल्याने त्याला जीव गमवावा लागला. त्यामुळे देवेंद्र आणि राजनही थोडे घाबरलेले होते. २४ एप्रिलला राजनला कोरोनाची लागण झाली. त्याला ऑक्सिजनची गरज होती. केवळ एक दिवस पुरेल इतका ऑक्सिजन शिल्लक होता. देवेंद्रने त्याचा मित्र संजयला फोन करुन सर्व काही सांगितले. संजयने देवेंद्रला राजीवला त्याच्या घरी आणण्याचा सल्ला दिला. १३०० किलोमीटरवर असलेल्या गाझियाबादच्या वैशाली या ठिकाणी संजय राहता होता.

- Advertisement -

आपल्या जिवाची कोणतीही काळजी न करता देवेंद्र कुमार शर्मा आपल्या कोरोना पॉझिटिव्ह मित्राला घेऊन १३०० किलोमीटरवर असलेल्या गाझियाबाद येथील वैशाली या ठिकाणी पोहचला. तिथे संजयच्या मदतीने राजला ऑक्सिजन सिलेंडर मिळाला व त्याचे प्राण वाचले. राजनवर सध्या संजयच्या घरी उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर आपल्या मित्रामुळे आपण वाचलो म्हणून राजनही खूप खुश आहे. सध्या राजनची तब्येत ठिक असून तो आराम करत आहे.


हेही वाचा – चिंताजनक! देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक मृत्यूची नोंद, पॉझिटिव्ह रुग्णही वाढले

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -