घरठाणेघाडगे यांच्या लेटरबॉम्बचे कल्याण, डोंबिवलीत पडसाद

घाडगे यांच्या लेटरबॉम्बचे कल्याण, डोंबिवलीत पडसाद

Subscribe

गुन्हा दाखल झालेल्या पलिका अधिकार्‍यांची अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव

कल्याण शहरातील दोन बिल्डर्स आणि महापालिका अधिकार्‍यांविरोधात येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात हस्तक्षेप करून महापालिका अधिकार्‍यांची नावे गुन्ह्यातून वगळण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतरांविरोधात पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी अकोला येथे दाखल केलेल्या एफआयआरचे पडसाद गुरुवारी कल्याण डोंबिवली महापालिकेत उमटले आहेत. या प्रकरणातील बांधकाम व्यावसायिकांसह महापालिकेच्या अधिकार्‍यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे वृत्त आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी फोडलेल्या लेटरबॉम्बने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच बुधवारी घाडगे यांनी अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस ठाणे येथे परमबीर सिंह यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यानुसार घाडगे हे बाजारपेठ पोलीस ठाणे कल्याण येथे पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक असताना त्यांच्याकडे तपासासाठी सोपविण्यात आलेल्या एका गुन्ह्यात काही बांधकाम व्यावसायिकांसह महापालिकेच्या १५ अधिकार्‍यांना आरोपी करण्यात आले होते. यात कल्याण डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. डी. शिंदे, गोविंद राठोड आणि रामनाथ सोनवणे, यांच्यासह महापालिकेच्या नगररचना विभागाचे तत्कालीन २ सहाय्यक संचालक व इतर अधिकार्‍यांचाही समावेश होता.

- Advertisement -

परमबीर सिंह यांच्यासह इतरांविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील बांधकाम व्यावसायिकांसह महापालिकेच्या अधिकार्‍यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतल्याचे समजते. या गुन्ह्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कलमे आहेत.

या प्रकरणी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी घाडगे यांना १५ एप्रिल २०१५ रोजी ठाणे पोलीस आयुक्तालयातील आपल्या कार्यालयात भेटायला बोलावून त्यांना, ‘सदर प्रकरणातील महापालिकेच्या अधिकार्‍यांचा विभागीय चौकशीचा अहवाल महापालिकेच्या आयुक्तांना पाठवा व त्यांची नावे गुन्ह्यातून काढून टाका. तसेच गुन्ह्यात लावण्यात आलेले लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम काढून टाका’, असे बेकायदेशीर तोंडी आदेश दिल्याचे घाडगे यांनी आपल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -