घरताज्या घडामोडीCorona Second Wave: आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर आता ३१ मेपर्यंत बंदी, DGCAची घोषणा

Corona Second Wave: आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर आता ३१ मेपर्यंत बंदी, DGCAची घोषणा

Subscribe

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच अनुषंगाने डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एविएशन (DGCA)ने अनुसूचित आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक उड्डाणांवरील बंदी ३१ मे २०२१ पर्यंत वाढविली आहे. DGCAच्या या घोषणेनंतर सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत स्थगित ठेवण्यात येतील. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घालण्यात आली होती.

DGCAने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, आवश्यक असल्यास संबंधित प्राधिकरणाच्या मान्यतेने काही आंतरराष्ट्रीय मार्गांवर उड्डाणे चालविली जाऊ शकतात. यापूर्वी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदीचा कालावधी ३० एप्रिल २०२१ पर्यंत वाढविण्यात आला होता. गेल्या वर्षी कोरोनामुळे मार्चपासून आंततराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली होती. त्यानंतर मे २०२० मध्ये देशांतर्गत उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान देशात आज तब्बल ३ लाख ८६ हजार ८८८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३ हजार ५०१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर देशात आज २ लाख ९५ हजार ४८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या देशात ३१ लाख ६४ हजार ८२५ सक्रिय रुग्णसंख्या आहे. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ८७ लाख ६२ हजार ९७६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख ८ हजार ३३० जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी ५३ लाख ८४ हजार ४१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – corona virus update:भारतातील कोरोना संसर्ग ‘या’ कारणासाठी जगासाठी ठरु शकते संकट


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -