घरCORONA UPDATECorona Update : देशात कोरोना रूग्णसंख्येचा ४ लाखांचा विक्रमी आकडा, ३ लाख...

Corona Update : देशात कोरोना रूग्णसंख्येचा ४ लाखांचा विक्रमी आकडा, ३ लाख कोरोनामुक्त

Subscribe

कोरोनाच्या महामारीला भारतात सुरूवात झाल्यापासून देशात पहिल्यांदाच रेकॉर्डब्रेकिंग अशी कोरोना रूग्णांची नवीन विक्रमी आकडेवारी आज शनिवारी नोंदवण्यात आली. देशात ४ लाख १ हजार ९९३ कोरोना रूग्णांची नोंद झाली. तर गेल्या २४ तासांमध्ये सुमारे ३५२३ रूग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची आकडेवारी केंद्रीय सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यासोबतच देशात जवळपास ३ लाख कोरोना रूग्णांनी कोरोनावर मात केल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णसंख्या वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतात तीन लाख रूग्ण गेल्या २४ तासात कोरोनामुक्त झाले असले तरीही अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ही ३२ लाख ६८ हजार ७१० इतकी आहे. देशात आता कोरोना संक्रमित झालेल्या रूग्णांची आकडेवारी १ कोटी ९१ लाख ६४ हजार ९६९ इतकी झाली आहे.

- Advertisement -

गुजरातमधील भरूच येथे हॉस्पिटलला आग लागल्याची घटनाही गेल्या २४ तासांमध्ये घडली. या घटनेत तब्बल १८ कोरोना रूग्णांचा मृत्यू हॉस्पिटलच्या आगीत झाला. त्यामध्ये रूग्णांसह, डॉक्टर्स आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. राज्य सरकारमार्फत या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख रूपयांची मदत करण्यात आली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी या रकमेची घोषणा केली आहे. तसेच घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांसोबत आम्ही आहोत. तसेच राज्य सराकरा म्हणून आर्थिक सहाय्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारतात आज कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीमेला सुरूवात झाली. अनेक राज्यांमध्ये १८ ते ४४ वयोगटासाठीचे लसीकरण आजपासून सुरू झाले. तर अनेक राज्यांनी लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आजपासूनच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीमेची सुरूवात न करण्याचा निर्णय़ घेतला आहे. देशात महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात आणि ओरिसा यासारख्या राज्यांनी लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -