घरमहाराष्ट्रकोरोनाच्या संकटात आरोग्य विभागात १६ हजार पदांची मेगाभरती!

कोरोनाच्या संकटात आरोग्य विभागात १६ हजार पदांची मेगाभरती!

Subscribe

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभागात तब्बल १६ हजार पदांची भरती प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामध्ये क आणि ड वर्गातील एकूण १२ हजार पदे, ब वर्गातील २ हजार पदे आणि २ हजार विशेषज्ञांचा समावेश असणार आहे. येत्या आठवड्याभरात यासंदर्भातली शासन पातळीवरची निर्णय प्रक्रिया पार पाडली जाईल आणि त्यानुसार भरती प्रक्रियेला सुरुवात केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

बुधवारी राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत भरती प्रक्रियेचे पुढील निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आरोग्य विभाग, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना देण्याचा ठराव झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. रुग्णसेवेशी संबंधित पदांची १०० टक्के भरती करण्याची आवश्यकता आहे, असं मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही सांगितलं. कॅबिनेटने ठरवलं आहे की आता आरोग्य विभाग, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या स्तरावर हा निर्णय येत्या २ ते ३ दिवसांत घेतला जाईल. तसंच, तातडीने परीक्षा घ्याव्यात असं देखील ठरवण्या आलं असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

- Advertisement -

१२ हजार ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील जागा, २ हजार ‘ब’ वर्गातील डॉक्टर-मेडिकल ऑफिसर आणि २ हजार स्पेशालिस्ट यांच्या जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची शासन स्तरावरील कारवाई आठवड्याभरात पूर्ण होईल, अशी माहिती टोपे यांनी दिली. त्यानंतर ‘क’ आणि ‘ड’ वर्गासाठी एजन्सीच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाईल. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या माध्यमातून ‘ब’ वर्गाच्या मुलाखती घेतल्या जातील. तर ‘अ’ वर्गासाठीची निवड MPSC कडे पाठवले जातील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -