घरअर्थजगततुम्ही SBI ग्राहक आहात? असं करा घरबसल्या बचत खातं दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर

तुम्ही SBI ग्राहक आहात? असं करा घरबसल्या बचत खातं दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर

Subscribe

जर तुमचे स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (SBI) खाते असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना कोरोना काळात आपल्या ग्राहकांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यासारखाच एक निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. यानुसार, ग्राहकांना या महत्त्वाच्या कामासाठी आता बँक शाखेला प्रत्यक्ष भेट देण्याची गरज भासणार नाही. स्‍टेट बँक ऑफ इंडिया सध्या ग्राहकांना त्यांच्या वेबसाइट आणि अॅपच्या माध्यमातून त्यांचं खातं अगदी सहजतेने दुसऱ्या शाखेमध्ये ट्रान्सफर करण्याची सुविधा देत आहे. याकरता तुम्हाला बँकेत जाण्याची आवश्यकता राहणार नाही, तुम्ही YONO SBI, YONO Lite आणि बँकेच्या संकेतस्थळावर भेट देऊन घरबसल्याच हे काम करू शकतात.

असे करा बचत खाते दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर

  • सर्वप्रथम तुम्हाला www.onlinesbi.com वर लॉग इन करा. या संकेतस्थळावर तुम्ही गेल्यानंतर तुमचं युजरनेम आणि पासवर्ड टाकून पर्सनल बँकिंगचा पर्याय निवडा.
  • यानंतर ई-सर्व्हिसेसवर जाऊन ट्रान्सफर ऑफ सेव्हिंग अकाउंटवर क्लिक करा. त्यानंतर जे खाते ट्रान्सफर करायचे आहे त्याचा पर्याय निवडा.
  • जर तुमच्याकडे केवळ एकच बँक खाते आणि तुमची कस्टमर इन्फरमेशन फाइल असेल तर हा पर्याय आपोआप सिलेक्ट होईल.
  • यानंतर ज्या बँकेत खातं ट्रान्सफर करायचं असेल त्या बँकेचा कोड तुम्हाला निवडावा लागेल.
  • नियम आणि अटी वाचल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा.
  • तुमच्या खात्याच्या ट्रान्सफरचे सर्व डिटेल्स सध्याच्या शाखेच्या कोड आणि नवीन बँकेच्या कोडसह व्हेरिफाय करा.
  • त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल, ओटीपी टाकून पुन्हा एकदा कन्फर्म या बटणावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल ज्यामध्ये शाखा ट्रान्सफर झाल्याचे सांगण्यात येईल.
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -