घरलाईफस्टाईलHealthTips: मधुमेह नियंत्रणासाठी फायदेशीर दालचीनी,औषधी गुणधर्मायुक्त दालचीनीचे फायदे जाणून घ्या!

HealthTips: मधुमेह नियंत्रणासाठी फायदेशीर दालचीनी,औषधी गुणधर्मायुक्त दालचीनीचे फायदे जाणून घ्या!

Subscribe

दालचीनी पाउडर बनवून त्यात मध एकत्र करून सेवन केल्यास मधुमेह असणार्‍या व्यक्तींना याचा नक्की लाभ होऊ शकतो.

मधुमेह म्हणजेच डायबिटीज ही अशी समस्या आहे ज्यात व्यक्तीच्या शरीरातील इंसुलिनचा स्तर वाढू किंवा कमी होऊ लागतो. यामुळे त्या व्यक्तीला चक्कर ,थकवा,सूज येणे,शरीर थरथरणे यासारख्या अन्य सस्यांना अचानक सामोरे जावे लागते. तसेच मधुमेह असणार्‍या व्यक्तींना काही इतर आजारांचा देखील सामना करावा लागतो. याकरिता मधुमेह असणार्‍या व्यक्तींनी आहारात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्य तज्ञाच्या मतानुसार दालचीनी हे शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी अत्यंत प्रभावकरी आणि उपयुक्त आहे असे सांगण्यात आले आहे. तर दालचीनी कशा प्रकारे मधुमेहाचा स्तर नियंत्रित राखू शकते तसेच दालचीनीमध्ये आढळणार्‍य औषधी गुणधर्माची माहिती आपण जाणून घेऊया .

अॅंटी- डायबीटीक दालचीनी – आरोग्य तज्ञाच्या मतानुसार दालचीनी हे अॅंटी- डायबीटीकयुक्त आहे. या मध्ये असणारे तत्व शुगर लेवल कंट्रोल करण्यास मदत करते. तसेच अॅंटी- ऑक्सिडेंट् आणि पॉलीफेनाल याचे स्त्रोत असणारे दालचीनी मधुमेह असणार्‍या व्यक्तींकरिता अत्यंत लाभदायक आहे.

- Advertisement -

कोलेस्ट्रॉल नियंत्रनास फायदेशीर – अभ्यासानुसार मधुमेह असणार्‍या व्यक्तींचे जर शुगर लेवल नियंत्रित नसेल तर त्यांना इतर आजार होण्याचीही दाट शक्यता आहे. अशातच दालचीनीचे सेवन त्यांचे कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यास मदत करू शकेल. तसेच यामुळे हृदयरोगाचा त्रास देखील कमी होऊ शकतो.

रक्तातील शुगर लेवलचा स्तर नियंत्रित राखते- जेवण झाल्यानंतर अनेक डायबीटीज असणार्‍या व्यक्तींची रक्तातील शुगर वाढू लागते. दररोज दालचीनीचे सेवन केल्यास याचा त्रास कमी होऊ शकतो तसेच यामुळे आरोग्य ही उत्तम रखण्यास मदत मिळते.

- Advertisement -

कसे कराल दालचीनीचे सेवन-

दैनंदिन जीवनात दररोज आपल्या डाएट मध्ये दिवसातून 3 वेळेस 500 ग्राम दालचीनीचा समावेश करावा. तसेच दररोज रात्री पाण्यात दालचीनी भिजवून दिवसभर थोड्या थोड्या वेळाणी पाणी प्या. दालचीनी पाउडर बनवून त्यात मध एकत्र करून सेवन केल्यास मधुमेह असणार्‍या व्यक्तींना याचा नक्की लाभ होऊ शकतो.


हे हि वाचा – गरम पाण्याची अंघोळ, गरम पाणी प्यायल्याने कोरोना होत नाही? केंद्राचे स्पष्टीकरण

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -