घरटेक-वेकWhatsApp च्या माध्यमातून पत्ता शोधण्यासह एखाद्याला ट्रॅक करणं होणार सोपं; वाचा सविस्तर

WhatsApp च्या माध्यमातून पत्ता शोधण्यासह एखाद्याला ट्रॅक करणं होणार सोपं; वाचा सविस्तर

Subscribe

सोशल मीडियातील सर्वाधिक युजर्स असणारं अॅप्लिकेशन म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप. व्हॉट्सअ‍ॅप आज सर्व वयोगटातील लोकांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. सर्वच वयोगटातील व्यक्ती प्रत्येक जण आपला बराचसा वेळ व्हॉट्सअ‍ॅपवर घालवताना दिसतात. अनेक जण व्हॉट्सअ‍ॅपवर आपला बराचसा वेळ घालवतात मात्र तरीही अनेकांना या अ‍ॅपचे बरेच खास फीचर्स विषयी माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपच्या अशाच एका खास फीचर्सबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला सहजपणे एखादा नवीन पत्ता शोधणं शक्य होणार आहे. या फीचर्ससह तुम्ही तुमचे लोकेशन आपल्या मित्रांना किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला पाठवू शकता. तसेच आपण हे फीचर्स आपल्या सुरक्षिततेसाठी देखील वापरू शकता. जाणून घ्या, याविषयी सविस्तर…

असं शेअर करा तुमचं लोकेशन

  • सर्वात पहिल्यांदा आपले व्हॉट्सअॅप ओपन करा.
  • त्यानंतर आता चॅट ऑप्शनवर जा.
  • आता ज्या व्यक्तीला तुम्ही तुमचे लोकेशन पाठवू इच्छित आहात त्याचे नाव निवडा आणि त्याचे चॅट ओपन करा.
  • यानंतर व्हॉट्सअॅप चॅटमध्ये ‘+’ किंवा खाली असलेल्या क्लिप चिन्हावर क्लिक करा.
  • त्यानंतर येथे लोकेशन ऑप्शन सिलेक्ट करा.
  • या पर्यायावर गेल्यास तुम्हाला Send Your Current Location आणि Share Live Location असे दोन पर्याय दिसेल, यानुसार तुम्ही कोणताही पर्याय निवडून तुमचे लोकेशन पाठवू शकतात.
  • लोकेशन निवडल्यानंतर सेंड वर क्लिक करा.

तुम्ही एखाद्यास Current location पाठवत असल्यास, तुम्ही सध्या असलेल्या ठिकाणाहून हे लोकेशन शेअर केले जाते. जर तुम्ही तुमचे Live location पाठविले तर ते तुमचे स्थान असेल जेथे तुम्ही असाल आणि तुम्ही त्या ठिकाणाहून स्थानांतरित होताच हे लोकेशन बदलेल. यावेळी हे Live location पाठवताना तुम्हाला ते समोरच्या व्यक्तीला किती वेळासाठी पाठावायचे त्याचे पर्याय निवडावे लागतील. जसे की, १५ मिनिट, ८ तास किंवा तासाभरासाठी देखील शेअर करू शकतात. यामाध्यमातून तुम्हाला एखाद्या व्यक्तीला ट्रॅक करण्यासह त्याचा पत्ता शोधणं सहज सोपं होणार आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -