घरताज्या घडामोडीकाँग्रेसच्या आंदोलनात नियमांचा फज्जा, मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याची दरेकरांची मागणी

काँग्रेसच्या आंदोलनात नियमांचा फज्जा, मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याची दरेकरांची मागणी

Subscribe

गुन्हा दाखल करताना सत्ताधाऱ्यांना वेगळा नियम आणि विरोधकांना वेगळा नियम आहे का?

केंद्र सरकारच्या आणि पंतप्रधान मोदींच्या ७ वर्षांच्या कार्यकालच्या विरोधात घेतलेल्या आंदोलनात नियमांचे फज्जा उडाला आहे. जनतेच्या सहभागाने घेऊ असे सांगितले होते कुठल्याही ठिकाणी १ टक्काही जनतेचा प्रतिसाद आंदोलनाला मिळालेला नाही. या आंदोलनात ही वस्तुस्थिती पाहायला मिळाली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील मुख्यमंत्र्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन राज्यातील जनतेला केले होते. परंतु या काँग्रेसच्या आंदोलनानं सोशल डिस्टंन्सिंगची एैशी की तैशी करुन टाकली आहे.

मुंबईतले काँग्रेसच्या आंदोलनात भाई जगताप, नसीम खान, चरणसिंह सापरा या नेत्यांच्या तोंडावर मास्क नव्हता तसेच कोरोना रोगाच्या गाफीलपणा असे होर्डिंग हाता घेऊन स्वतःच नियम पाळले नाहीत. राज्यभरातील सर्व फोटो मिळवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहणार असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. तसेच मुंबई, धुळे काँग्रेसभवन, नाना पटोलेंचे भाषण, नांदेड, अहमदनगर,सांगली नागपूर,पनवेल अशा ठिकाणी नागरिकांची गर्दी होती. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे दरेकरांनी सांगितले आहे.

- Advertisement -

दरम्यान प्रवीण दरेकरांनी म्हटले आहे की, आम्ही ज्यावेळी लोकांच्या हितासाठी आंदोलनं केली तेव्हा आमच्यावर कारवाई करण्यात आली. काही चुकीचे केले नाही आपला तो अधिकार आहे असेही दरेकरांनी सांगितले तर बीडमध्ये आंदोलन केले यावेळी ८ ते १० जण होतो गुन्हा दाखल केला. लोक्यांच्या न्याय हक्कासाठी सायन सायन रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन केले तेव्हा आमदार मंगलप्रभात लोढा यांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करताना सत्ताधाऱ्यांना वेगळा नियम आणि विरोधकांना वेगळा नियम आहे का? असा सवाल केला आहे. तसेच सर्वांवर गुन्हा दाखल करुन कारवाई व्हावी अशी मागणी असल्याचे प्रवीण दरेकरांनी केली आहे.

लॉकडाऊन शिथिल करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ संवाद साधू नये त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनात, व्यापारांच्या मनात ज्या काही मागण्या आहेत त्या ओळखून दिलासा दिला पाहिजे. ज्याप्रमाणे कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे तर लॉकडाऊनमध्ये शिथिलता करण्यात यावी. राज्यातील अनेकांनी बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना घडत आहेत. कर्जबाजारी झालेले लोक आत्महत्या करण्याचा मनस्थितीत आहेत. म्हणून सगळ्या गोष्टींचा विचार करुन मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेण्याची गरज असल्याचे विधानपरिषदिचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -