घरताज्या घडामोडीलस नाही तर लसीकरण केंद्र का उघडता?, दरेकरांचा मुंबई महानगरपालिकेला सवाल

लस नाही तर लसीकरण केंद्र का उघडता?, दरेकरांचा मुंबई महानगरपालिकेला सवाल

Subscribe

मुंबई महापालिका क्षेत्रात लसीकरण केंद्र थाटात उघडतात, पण लस नाहीत!

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लसीकरण हाच एक प्रभावी उपाय आहे. राज्यात सर्वच जिल्ह्यातील लसीकरण केंद्र लसींच्या तुटवड्यामुळे अध्याहून जास्त बंद आहेत. मुंबईत महानगरपालिका क्षेत्रातही लसीकरण केंद्र मोठ्या थाटात उघडली जात आहे. परंतु लसीच उपलब्ध नसल्यामुळे अखेर त्यांना बंद ठेवण्यात आले आहेत. यावरुन लसींचा साठाच नाही तर लसीकरण केंद्र का उघडता? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षेनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई महानगरपालिकेला केला आहे.

भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लसीकरण केंद्रांच्या उद्घाटना आणि लसीकरण केंद्राच्या निर्मितीवरुन पालिकेवर निशाणा साधला आहे. लसींचा तुटवडा असला तरी महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण केंद्र उभारले जात आहेत. “मुंबई महापालिका क्षेत्रात लसीकरण केंद्र थाटात उघडतात, पण लस नाहीत! लसीकरणाचा पुरता बोजवारा उडाला असून नियोजनाचा अभाव जाणवतो. लस नाही तर लसीकरण केंद्र का उघडता? लोकांचा व यंत्रणांचा वेळ फुकट का घालवता?” असा सवालही प्रवीण दरेकर यांनी पालिकेला केला आहे. स्वतःचे कौतुक करून घेत असताना लसीकरणाचे ढिसाळ नियोजन व मुंबईकरांना होतं असलेल्या गैरसोयीची ‘जबाबदारी’ पण मुंबई महानगरपालिकेने घ्यावी असे प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत म्हटले आहे.

- Advertisement -

ग्लोबल टेंडरचा बार फुसका ठरला

मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. परंतु या ग्लोबल टेंडरला ७ कंपन्यांनी प्रतिसाद दिला असल्याचे सांगण्यात आले होते. यामध्ये काही कंपन्यांनी लसींची किंमत आणि कागदपत्रे जोडले नव्हते. यावरुन दरेकरांनी निशाणा साधला आहे. ग्लोबल टेंडरचा बार फुसका ठरलाय, दीड महिन्यांपुर्वी परवानगी देऊनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महानगरपालिका लस खरेदी करु शकली नाही. केंद्र सरकारने मोफत लसी पुरवल्या आहेत. घोषणा सम्राट सरकारने नियोजन न करत मोफत लसीकरणाची घोषणा केल्यामुळे महाराष्ट्रात लसीकरणाचा फज्जा उडाला असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -