घरCORONA UPDATECovid-19 : लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना आता औषधांचा गरज नाही, केंद्राचा दावा

Covid-19 : लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना आता औषधांचा गरज नाही, केंद्राचा दावा

Subscribe

अँटीबायोकीट आणि अँटीफंगल औषधांचा उपयोग डॉक्टरांच्या सल्ल्याने करा

देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांसाठी आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्या मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार आता ज्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आढळत आहेत असा रुग्णांना कोणत्याही औषधांची गरज नाही. पण जे रुग्ण दुसऱ्या कोणत्या आजारावर औषधे घेत आहेत ती सुरुच ठेवावी असा सल्लाही आरोग्य मंत्रालाने दिला. तसेच अशा रुग्णांनी टेली कन्स्लटेशन (व्हिडिओद्वारे उपचार) घ्यावेत आणि चांगला आहार सेवन करावा, बाहेर पडताना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगसारख्या कोरोनासंबंधीत नियमांचे पालन करा असेही आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले. केंद्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्विसेसने (DGHS)या नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन, आइवरमेक्टिन, डॉक्सीसाइक्लिन, जिंक गोळी बंद करा 

या मार्गदर्शक सुचनांमध्ये , कोरोनाची लक्षण नसलेल्या रुग्णांवर उपचारादरम्यान वापरण्यात येणारी सर्व औषधे यादीतून हटवली आहेत. यात ताप, सर्दी खोकल्याच्या औषधांचाही समावेश आहे. वाफ घ्यायची नाहीय. कोणतेही अँटीबायोटीक घ्यायचे नाहीय. आयव्हरमेक्टीनचा वापर करायचा नाहीय. तसेच कोरोनाची लक्षण नसलेल्या रुग्णांना इतर चाचण्या करण्याचीही आवश्यकता नसल्याचे केंद्राने म्हटले आहे. यापूर्वी २७ मे रोजी देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या उपचाारांसाठी नवीन मार्गदर्शक सुचना जाहीर झाल्या होत्या. त्यानुसार सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन, आइवरमेक्टिन, डॉक्सीसाइक्लिन, जिंक आणि मल्टीविटामिन या औषधांचा वापर करुन नका असे सांगितले होते. तसेच लक्षणं नसलेल्या रुग्णांना सीटी स्कॅन सारख्या अनावश्यक चाचण्या लिहून देण्याची गरज नसल्याचेही डॉक्टरांना सांगितले आहे.

- Advertisement -

अँटीबायोकीट आणि अँटीफंगल औषधांचा उपयोग डॉक्टरांच्या सल्ल्याने करा 

परंतु ICMR च्या मार्गदर्शक सुचनांनुसार, कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णास शुगर तपासावी लागणार आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेण्याची मुभा आहे. परंतु अँटीबायोकीट आणि अँटीफंगल औषधांचा उपयोग हा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये असे सांगितले आहे, ऑक्सिजन घेत असल्यास ह्यूमिडिफायरमध्ये स्वच्छ पाणी वापरावा. हायपरग्लाइसीमियाला नियंत्रित ठेवा, प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधं बंद करावीत, अँटीफंगल प्रोफिलँक्सिसची गरज नसल्यास ते घेऊ नये, आपल्या शरीरात पाणी कमी होऊ देऊ नका याची काळजी घ्यावी अशा सुचना आयसीएमआरने केल्या आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -