घरदेश-विदेशबारामतीच्या चहावाल्याने मोदींना दाढी करण्यासाठी थेट पाठवली १०० रूपयांची मनी ऑर्डर!

बारामतीच्या चहावाल्याने मोदींना दाढी करण्यासाठी थेट पाठवली १०० रूपयांची मनी ऑर्डर!

Subscribe

देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा फैलाव तितक्याच वेगाने होत आहे. अशातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षात लॉकडाऊन करण्याची वेळ प्रशासनावर आली. या लॉकडाऊनदरम्यान, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या काहींच्या पगारात मोठी कपात झाली आणि त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढावले. अशापरिस्थितीत नाराज असलेल्या बारामतीतील एका चहा विक्रेत्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना अवघ्या शंभर रूपयांची मनी ऑर्डर करून आपल्या मागण्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे.

- Advertisement -

असे आहे नेमके प्रकरण

बारामतीतील इंदापूर रस्त्यावर एका खासगी रुग्णालयासमोर एक चहाविक्रेत्याने पंतप्रधान मोदींना १०० रूपयांची मनी ऑर्डर पाठवून सर्वांचेच लक्ष केंद्रित केले आहे. या लहानशा चहावाल्याचे नाव अनिल मोरे असे असून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, गेल्या दीड वर्षात लॉकडाऊन असल्याने घराचा गाडा ओढणे अवघड झाले आहे. त्यामुळे नाराज असलेल्या मोरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आपल्या मागण्या व्यक्त केल्या आहेत.

असे म्हटले पत्रात…

”पंतप्रधान मोदी दाढी वाढवून फिरत आहेत. जर त्यांना काहीतरी वाढवायचे असेल तर लोकांसाठी रोजगार वाढवावा. लोकांसाठी आरोग्य सुविधासह लसीकरण केंद्र वाढवावे. लोकांची समस्या सुटतील याची काळजी घ्यावी. मोदी यांचे पद देशाचे सर्वोच्च पद आहे. माझ्या कमाईतून पंतप्रधन मोदी साहेबांना दाढी करण्यासाठी मी १०० रुपये पाठवत आहे. पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च नेते आहेत ते आमचा त्यांच्याबद्दल आदर आहे, त्यांना त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. परंतु कोरोना साथीच्या आजारात ज्या प्रकारे लोकांच्या समस्या वाढत आहेत. लोकांसाठी आरोग्यासह रोजगार वाढवावा.” अशा मागण्या मांडत पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा मार्ग स्वीकारला असल्याचे मोरे यांनी सांगितले.

- Advertisement -

पत्राद्वारे केली अशी मागणी

अनिल मोरे यांनी मनीऑर्डर सोबत एक पत्र पाठवून कोरोनादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबाला पाच लाख रुपये देण्याची मागणी देखील त्यांनी केली. याशिवाय पुढील लॉकडाऊन लागू केल्यास एका कुटुंबासाठी ३० हजार रुपये द्यावेत,अशी देखील मागणी मोरे यांनी केली आहे.


केंद्राकडून राज्यांना लस उपलब्धततेसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -