घरताज्या घडामोडीरक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या भीतीमुळे घाबरू नका, लस घ्या अन्यथा... - तज्ज्ञ

रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या भीतीमुळे घाबरू नका, लस घ्या अन्यथा… – तज्ज्ञ

Subscribe

जगभरात सर्वत्र कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबवली गेली आहे. यादरम्यान लस घेतल्यानंतर होणारे दुष्परिणाम समोर आले आहेत. बऱ्याच देशांमध्ये लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठल्या होत असल्याच्या केसेसनंतर जगभरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या शरीरात आधीच रक्ताच्या गुठल्या झाल्या आहेत किंवा जे लोकं रक्त पातळ होण्याचे औषध घेते आहेत, ते लोकं डॉक्टरांकडून लस घेण्याबाबत विशेष सल्ला देत आहेत. पण तज्ज्ञांनी अशा लोकांनी लस जरूर घ्या, असा सल्ला दिला आहे.

विशेष तज्ज्ञ म्हणाले की, ‘लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होणे हे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका असल्यामुळे गुठळ्या होतात त्यापेक्षा अगदी वेगळे आहे. रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या भीती पोटी लस न घेण्याची जोखीम करू नका, अन्यथा संसर्गाचा धोका नेहमीच वाढत जाईल.’

- Advertisement -

रक्ताच्या गुठळ्या कशा तयार होतात?

आपल्या शरीरात रक्त वाहिन्यांमध्ये द्रव्य स्वरुपात वाहते. प्रत्येक अवयवांपर्यंत ऑक्सीजन, षोषक तत्व, प्रोटीन आणि रोगप्रतिकारशक्ती पेशी पोहोचवते. शारीरिक हानीचे संकेत मिळताच, सर्वात लहान रक्त पेशी (प्लेटलेट्स) खराब झालेल्या रक्तवाहिन्याच्या बाजूला चिकटून राहतात आणि तिथे गुठळ्या होत असलेल्या प्रोटीनद्वारे रक्त प्रवाह रोखतात.

लस आणि टीटीएस

एस्ट्राजेनेका लसीचा थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS)सोबत एक दुर्मिळ दुष्परिणाम असल्याचे नोंदवले गेले आहे. टीटीएस एक असामान्य प्रतिकारशक्तीमुळे होतो. यात रक्तामध्ये असलेले प्लेटलेट्स अतिसक्रिय होत जातात, ज्यामुळे शरीरात गुठळ्या तयार होतात. गुठळ्या होण्याच्या या प्रक्रियेत प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होत जाते. तसेच शरीरात प्लेटलेट्सची संख्याही कमी होत जाते. रक्तामध्ये प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होणे यालाच थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणतात.

- Advertisement -

हेही वाचा – covishield vs covaxin :कोवॅक्सिनपेक्षा कोव्हिशील्ड अधिक प्रभावी; या संशोधनावर भारत बायोटेकने व्यक्त केला संताप


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -