घरमहाराष्ट्रनाशिकअन्यथा... वारकरी रस्त्यावर उतरणार

अन्यथा… वारकरी रस्त्यावर उतरणार

Subscribe

पायी वारीला शासनाने परवानगी देण्याच्या मागणीसाठी आचार्य तुषार भोसले यांचा इशारा

यंदाच्या आषाढी वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकर्‍यांना मान्य नाही. सरकारने हा निर्णय तातडीने बदलावा अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वस्वी जबाबदार असतील, असा इशारा भाजपप्रणित अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी दिला.

नाशिकमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या मोजक्या वारकर्‍यांच्या उपस्थितीत आषाढी वारीच्या निर्णयाचा विरोध केला. हा निर्णय घेऊन राज्य सरकारने वारकर्‍यांचा अपमान केलाय. वारकर्‍यांना हा निर्णय मान्य नाही. मी स्वत: यंदा पंढरपूरला पायी जाणार आहे. वारकरी रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ भाजपशी आहे, हे राज्य सरकारने लक्षात ठेवावं, असा इशाराही त्यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -