घरगणपती उत्सव बातम्यापालिकेच्या गणेश गौरव स्पर्धेत 'स्वप्नाक्षय'ला प्रथम क्रमांक!

पालिकेच्या गणेश गौरव स्पर्धेत ‘स्वप्नाक्षय’ला प्रथम क्रमांक!

Subscribe

अंधेरी सात बंगला येथील 'स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'ला मुंबई महापालिकेच्या गणेश गौरव स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. मुंबई महापालिकेकडून या मंडळाला प्रथम पारितोषिक म्हणून ७५ हजार रुपये दिले जाणार आहेत. जनसंपर्क विभाग आयोजित श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचे हे ३० वे वर्ष आहे.

अंधेरी सात बंगला येथील ‘स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ला मुंबई महापालिकेच्या गणेश गौरव स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. मुंबई महापालिकेकडून या मंडळाला प्रथम पारितोषिक म्हणून ७५ हजार रुपये दिले जाणार आहेत. जनसंपर्क विभाग आयोजित श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचे हे ३० वे वर्ष असून यंदाच्या स्पर्धेत बृहन्मुंबईतील ७४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भाग घेतला होता. तज्ज्ञ परीक्षकांनी अंतिम फेरीसाठी १७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड केली. त्यानुसार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या स्‍पर्धेचा निकाल शनिवारी जाहीर केला. दरम्यान, या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचे ५० हजार रुपयांचे पारितोषिक कांजुरगाव शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देण्यात आले आहे. तर तृतीय क्रमांकाचे ३५ हजार रुपयांचे पारितोषिक लोअर परेल येथील गं. द. आंबेकर मार्ग (मध्य विभाग) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला जाहीर झाले आहे.

आम्ही नेहमीच अशी काहीतरी थीम घेऊन सजावट साकारतो. २०१६मध्ये आम्हाला अशाच प्रकारे पारितोषिक मिळालं होतं. अशा बक्षिसांमुळे आमचा हुरूप अधिकच वाढतो.

देवेंद्र आंबेरकर, अध्यक्ष, स्वप्नाक्षय मित्र मंडळ

सतिश गिरकर ठरले सर्वोत्कृष्ट मूर्तीकार!

याशिवाय सर्वोत्कृष्ट मूर्तीकार म्हणून अंधेरी येथील श्री गणेश क्रीडा मंडळाचे सतिश गिरकर यांना २५ हजार रुपये, सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार म्हणून माझगांव ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे स्वप्नील नाईक यांना २० हजार रुपये तर उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून दहिसर पूर्व येथील नवतरूण मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्‍सव आणि धारावी येथील श्री हनुमान सेवा मंडळ यांना प्रत्येकी १० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

- Advertisement -

तुम्हाला हे माहिती आहे का? – गणपती विसर्जन: मुंबईच्या ५३ रस्त्यांवर No Entry!


Panchaganga Utsav Mandal
शाडूच्या मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती

शाडूच्या मूर्तीसाठीही पारितोषिक

शाडू मातीच्या सर्वोत्कृष्ट मूर्तीसाठी ना. म. जोशी मार्गावरील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाला २५ रुपये, प्‍लास्‍टीक बंदी / थर्माकोल बंदीसाठी परेल गं. द. आंबेकर मार्ग येथील महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व साईराज गणेशोत्सव मंडळ यांना प्रत्येकी १० हजार रुपये, तर अवयवदान जागृतीसाठी विक्रोळी पश्चिम येथील बाल मित्र कला मंडळाला १५ रुपयांचे पारितोषिक जाहीर झाल्याचे महापौर महाडेश्वर यांनी यावेळी सांगितले.BMC Competition Third Prize

- Advertisement -

तृतीय क्रमांक – आंबेकर मार्ग मंडळ

दुसऱ्यांदा पहिला क्रमांक!

स्वप्नाक्षय गणेशोत्सव मंडळाला दुसऱ्यांदा पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. मंडळाकडून गेली ३८ वर्ष गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र (बाळा) आंबेरकर या मंडळाचे अध्यक्ष आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -