घरताज्या घडामोडीसरनाईकांप्रमाणे अनेकांची अशीच इच्छा, देवेंद्र फडणवीस यांची प्रताप सरनाईकांच्या पत्रावर प्रतिक्रिया

सरनाईकांप्रमाणे अनेकांची अशीच इच्छा, देवेंद्र फडणवीस यांची प्रताप सरनाईकांच्या पत्रावर प्रतिक्रिया

Subscribe

महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांचा प्रश्न आहे की, कोणी कोणाला जोडे मारायचे आहेत कोणी कोणाला हार घालायचे हा निर्णय त्यांना करायचा आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १० जूनरोजी पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केली आहे. तसेच भाजपशी जुळवून घेतल्यावर रविंद्र वायकर,अनिल परब आणि स्वतः सरनाईक यांना होणारा नाहक त्रास कमी होईल असे पत्रात म्हटलं आहे. यावर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरनाईक यांच्याप्रमाणेच अनेकांच्या इच्छा आहे परंतु हा मुद्दा भाजपचा नसून शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे. आम्ही जनतेची काम करत आहोत यामुळे येणाऱ्या निवडणूकींमध्ये भाजप स्वबळावर येईस असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, सरनाईकांप्रमाणे अशी अनेकांची इच्छा असू शकते परंतु याबाबत स्पष्ट मत आहे की, हा शिवसेनेचे अंतर्गत मुद्दा आहे. त्यांनी त्यांच्या पक्षप्रमुखांना पत्र लिहिले आहे. त्यांच्या प्रमुखांनी त्यांना काय सांगायचं हे ते सांगतील. भाजपचं पक्क आहे आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. जनतेची काम करणं आणि जनतेची काम करत असल्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, भाजपने जनतेच्या मनामध्ये प्रतिमा तयार केली आहे. यामुळे येत्या काळात आम्ही स्वबळावर येऊ असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

काँग्रेसनंतर आता शिवसेनेकडून स्वबळाचा नारा दिला असा सवाल फडणवीस यांना करण्यता आला होता. भाजप स्वबळावर लढत आहे. आता महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांचा प्रश्न आहे की, कोणी कोणाला जोडे मारायचे आहेत कोणी कोणाला हार घालायचे हा निर्णय त्यांना करायचा आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे त्यामुळे असच भाजप काम करत राहील असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भाजपशी जुळूवन घ्या

राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे.ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल असे मला वाटते. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना या पत्राद्वारे कळविल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतलाय, काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्‍त करतो असे आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे.

- Advertisement -

सरनाईकांच्या पत्रानं खळबळ

सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे. कोणताही गुन्हा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाला व शिवसोनेमुळे माजी खासदार” झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरु आहे त्यालाई कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट असताना आमच्या कुटुंबियांवर सुध्दा सतत आघात होत आहेत, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे , त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल. अस शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रातून शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -