घरताज्या घडामोडीCorona Vaccination: बोगस केंद्रात लस घेतल्यानंतर मिमी चक्रवर्तींवर गंभीर परिणाम

Corona Vaccination: बोगस केंद्रात लस घेतल्यानंतर मिमी चक्रवर्तींवर गंभीर परिणाम

Subscribe

पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आजारी पडल्या आहेत. अलीकडेच मिमी चक्रवर्ती यांनी बोगस लसीकरण केंद्रातून कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर मिमी यांनी ट्विट करून लस घेतल्यानंतर त्यांना कोणतीच समस्या उद्भवली नाही अशी माहिती दिली होती. परंतु लस घेतल्यानंतर ४ दिवसांनी मिमी आजारी पडल्या.

हिंदुस्तान टाईम्सच्या माहितीनुसार, मिमी चक्रवर्ती गंभीर आजारी पडल्या आहेत. अलीकडेच मिमी यांनी आपल्यासोबत फसवणूक झाल्याचा खुलासा केला होता. त्यांनी कोलकातामधील बोगस कोरोना लसीकरण मोहिम करणाऱ्या एका व्यक्तीचे भांडे फोडले. या व्यक्तीचे नाव देबांजन देव आहे, जो सध्या कोलकाता पोलिसांच्या ताब्यात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mimi (@mimichakraborty)

- Advertisement -

मिमी चक्रवर्ती यांना देबांजन देव याने स्वतः आयएएस ऑफिसर असल्याचे सांगितले होते. देबांजन म्हणाला होता की, तो कोलकातामध्ये सुरू असलेले लसीकरण मोहिमेचे निरीक्षण करत होता. आता सांगितले जात आहे की, देबांजनने शेकडो लोकांना बनावट लस दिली आहे. याप्रकरणी कोलकाता पोलीस तपास करत आहे.

दरम्यान या व्यक्तीने मिमी चक्रवर्ती यांना आपल्या लसीकरण मोहिमेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. त्यावेळी लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मिमी चक्रवर्ती यांनी देबांजनच्या लसीकरण मोहिमेत डोस घेतला. लस घेतल्यानंतर मिमी यांना कोणत्याही प्रकारे अधिकृतरित्या मॅसेज मोबाईलवर आला नाही. त्यानंतर मिमी यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

- Advertisement -

हेही वाचा – अभिनेत्री पायल रोहतगीला अटक, सोसायटीत केला राडा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -