घरमनोरंजनआता प्रसाद ओक म्हणणार,'ओक ठोक'!

आता प्रसाद ओक म्हणणार,’ओक ठोक’!

Subscribe

सगळ्यांचा लाडका अभिनेता प्रसाद ओकने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना खूशखबर दिली आहे. लवकरच तो एकपात्री कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. 'ओक ठोक' असं या कार्यक्रमाचं नाव आहे.

मराठी चित्रपटात, नाटकात आणि मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. त्याने या तिनही माध्यमात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर प्रसादने ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं. त्याच्या पदार्पणाच्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. प्रसाद सोशल मीडियावरही तितकाच अॅक्टिव्ह असतो. तो आपल्या चाहत्यांशी कायम कनेक्ट असतो. नुकतीच त्याने चाहत्यांना एक आनंदाची बातमी सांगतली आहे. त्याने त्याच्या आगामी कार्यक्रमाची घोषणा सोशल मीडियावर केली आहे. प्रसाद लवकरच एकपात्री कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर येतोय!

सोशल मीडियावर दिली खूशखबर!

प्रसादने स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना प्रसादने लिहिलं आहे की, ‘एक नवाकोरा करकरीत एकपात्री कार्यक्रम, ‘ओक ठोक’. हसत खेळत गुदगुल्या करत आपल्याला आपलाच आरसा दाखवणारा ‘स्टॅण्ड अप विथ स्टॅण्डर्ड’, आता रोख ठोक नाही ‘ओक ठोक’ बोलायचं!!! शुभारंभाचा प्रयोग २७ सप्टेंबर. महाराष्ट्र मंडळ ‘अबू धाबी’.

- Advertisement -

प्रसाद ओकचा हा शो एकदम खास असणार हे त्याच्या पोस्टवरूनच कळतंय. त्याच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षावर होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -