घरदेश-विदेशTicket Refund Rules: रेल्वे तिकिट रद्द केल्यास कापला जातो 'इतका' चार्ज? रेल्वेचे...

Ticket Refund Rules: रेल्वे तिकिट रद्द केल्यास कापला जातो ‘इतका’ चार्ज? रेल्वेचे महत्त्वाचे नियम

Subscribe

IRCTC Ticket Refund Rules : जर तुम्ही भारतीय रेल्वेत प्रवासासाठी तिकीट बुक केले मात्र काही कारणास्तव तुम्हाला प्रवास रद्द करावा लागला असेल तर तिकीटासंबंधीत नियम जाणून घेणे महत्वाचे आहे. तुमच्याकडे जर रेल्वे तिकीट रद्द करण्यासंदर्भातील नियमांची योग्य माहिती असल्यास तिकिट रद्द करण्याचा शुल्क कमी कापला जाईल किंवा फसवूणक होण्यापासून वाचता येईल. जाणून घेऊ भारतीय रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर मिळणाऱ्या रिफंडसंदर्भातील महत्त्वापूर्ण नियम…

RAC आणि वेटिंग लिस्ट तिकीटावरील रिफंड

तिकीट चार्ट तयार झाल्यानंतरही तुमचे तिकीट RAC आणि वेटिंग लिस्टमध्ये दाखवत असल्यास आपण ट्रेन सुटण्याच्या वेळेच्या ३० मिनिटेआधी तिकिट रद्द केल्यास स्लीपर क्लाससाठी ६० रुपये तिकीट रद्द करण्याचे शुल्क आकारले जाईल. तर एसी क्लाससाठी ६५ रुपये कापले जातील. तर तिकीटाची उर्वरित रक्कम तुम्हाला परत मिळेल.

- Advertisement -

कंफर्म तिकीटावरील रिफंड

जर तुमचे तिकीट बुकींग कंफर्म झाले असेल मात्र काही कारणास्वत तुमचे प्रवासाला जाणे अचानक रद्द् झाल्यास तिकीट रद्द करण्याबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण रेल्वेचे तिकिट रद्द करण्याच्या नियमांनुसार कंफर्म तिकिट रद्द करण्याची मुदतीची वेळ लक्षात घेणे फार महत्वाचे आहे. जर तिकीट रद्द करण्यासंदर्भातील वेळीची अचूक माहिती असल्यास कमी शुल्क आकरले जाईल आणि पैशांचे नुकसान होणार नाही. विशेष म्हणजे, जर कंफर्म तिकीट ट्रेन सुटण्याच्या वेळेच्या ४ तासांच्या आधी रद्द न केल्यास रेल्वेकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रिफंड मिळत नाही.

कंफर्म तिकीट रद्द करण्यासंदर्भातील नियम

रेल्वेचे कंफर्म तिकीट जर तुम्ही ट्रेन सुटण्याच्या ४८ तास रद्द केल्यास जनरल क्लास (2 एस)साठी ६० रुपये तिकीट रद्द शुल्क भरावे लागेल. तर स्लीपर क्लासचे तिकीट रद्द केल्यास १२० रुपयांचा चार्ज कापला जाईल. त्याचबरोबर एसी चेअर कार आणि थर्ड एसीसाठी हा चार्ज १८० रुपये इतका आहे. सेकंड एसीमध्ये २०० रुपये तर फर्स्ट एसी आणि एग्झिकेटिव्ह क्लाससाठी हा तिकीट रद्द करण्याचा २४० रुपये आहे. यावर वेगळी जीएसटी कर लागू होईल. पण ही गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाची आहे की, रेल्वे कोणत्याही स्लीपर क्लासच्या कोणत्याही तिकिटावर जीएसटी आकारत नाही, मात्र एसी क्लासच्या तिकिटावर रेल्वे जीएसटी आकारते.

- Advertisement -

जर तुम्ही कंफर्म तिकीट १२ तासांच्या आत किंवा ट्रेनच्या सुटण्याच्या वेळेच्या ४८ तासांच्या आत रद्द केले तर तिकीटाच्या रकमेतील २५ टक्के रक्कम कापली जाईल. तसेच ट्रेनच्या सुटण्याच्या वेळेच्या ५ तास आधी किंवा १२ तासांच्या दरम्यान तिकिट रद्द केले तर तिकिटाची ५० टक्के रक्कम परत केले जातील. परंतु ट्रेनच्या सुटण्याच्या वेळेच्या ४ तास आधी तिकिट रद्द करता येत नाही. असे केल्यास तिकीटाच्या रकमेतील एक रुपयातीहीप परत मिळत नाही.

म्हणून कंफर्म तिकीट ट्रेनच्या पार्सल वेळेच्या ४ तास अगोदर आणि वेटिंग लिस्ट व आरएसी तिकिट वेळेच्या ३० मिनिट अगोदर रद्द करणे फार महत्वाचे आहे. अन्यथा तुम्हा तिकीट रद्द केल्यानंतर एक रुपयाही परत मिळणार नाही.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -