घरमहाराष्ट्रपंकजा मुंडेंना मोठा धक्का, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचं बँक खातं सील

पंकजा मुंडेंना मोठा धक्का, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचं बँक खातं सील

Subscribe

भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि नेत्या पंकजा मुंडे यांना मोठ धक्का बसला आहे. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचं बँक खातं सील करण्यात आलं आहे. पीएफची रक्कम थकल्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) वतीने वैद्यनाथ कारखान्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पंकजा मुंडे या कारखान्याच्या अध्यक्षा आहेत.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने पीएफचे एक कोटी ४६ लाख रुपये थकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. ईपीएफओच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाने पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते जप्त केले. तब्बल ९२ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात स्थापनेची मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ काळासाठीची पीएफची १ कोटी ४६ लाख रुपये थकबाकी होती. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी वानखेडे यांनी ही कारवाई केली.

- Advertisement -

पगार न मिळाल्याने कामगारांचं संपाचं हत्यार

१९ महिने ७०० कामगारांना पगारच मिळाला नसल्याने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील कामगारांनी मार्च महिन्यात कारखाना बंद केला होता. जोपर्यंत पगार मिळत नाही, तोपर्यंत कारखाना सुरु करणार नसल्याची भूमिका घेत हे कामगार संपावर गेले होते. एकेकाळी वैद्यनाथ कारखाना आशिया खंडात नावाजला गेला. परंतु, मागिल काही वर्षांपासून व्यवस्थापनातील काही दोष, कायम पडणारा दुष्काळ यामुळे कारखाना अडचणीत आलेला आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी अनेक दिवस आंदोलन केले होते.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -