घरमहाराष्ट्ररत्नागिरी जिल्ह्यात 24 जुलै पर्यंत रेड अलर्ट जारी, मुसळधार ते अति मुसळधार...

रत्नागिरी जिल्ह्यात 24 जुलै पर्यंत रेड अलर्ट जारी, मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता

Subscribe

हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यानी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबधित विभागांना सतर्क राहून बचाव करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यभरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाल्याने अनेक घरे वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. आता भारतीय हवामान खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या बातमी पत्रानुसार रत्नागिरी जिल्ह्यासाठी २४ जुलै पर्यंत रेड अलर्ट असून मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यानी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबधित विभागांना सतर्क राहून बचाव करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने चढ उतार होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. तसेच चिपळूण मध्ये देखील पावसाने हाहाकार माजवला आहे. चिपळूण मधील पुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असून राष्ट्रीय आपदा प्रबंधन प्राधिकरणदोन पथके जिल्हा पोलीस दल तसेच काही स्वयंसेवी संघटना आणि कोस्ट गार्ड नागरिकांची सुटका करीत आहेत.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे कोल्हापूर,रत्नागिरी,कोकण,सिधुदुर्गा सारख्या इतर राज्यात पावसाने थैमान घातले असून नद्यांना देखिल पूर आला आहे.यामुळे नागरिकांचे स्थलांतरण करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.


हे हि वाचा – गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास आणखी ४० स्पेशल गाड्या सोडणार; रावसाहेब दानवेंची घोषणा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -