घररायगडरायगड जिल्हापरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार - आमदार महेंद्र दळवी

रायगड जिल्हापरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार – आमदार महेंद्र दळवी

Subscribe

रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आहेत.

रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आहेत त्यामुळे रायगडमध्ये शिवसेनेची ताकद वाढत आहे. रायगड जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणार, असे प्रतिपादन शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख आमदार महेंद्र दळवी यांनी वडखळ येथे शिवसैनिकांच्या बैठकीत केले. वडखळ येथे पेण तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांची बैठक आयोजित केली होती. यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र दळवी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नरेश गांवड, माजी जिल्हापरिषद सभापती संजय जांभळे, पेण शहर प्रमुख सुधाकर म्हात्रे, विभाग प्रमुख लवेंद्र मोकल, संतोष पाटील आदिसह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी बोरावाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.

पेण तालुका हा शिवसेनेचा गड आहे, पेणची राजकीय परिस्थिती बदललायला हवी. पेण नगरपालिका व पाली नगरपंचायतीची निवडणुक महत्वाची आहे. या निवडणुकांमध्ये युवकांना संधी दिली पाहीजे,रायगड जिल्ह्यातील अनेक नेते, कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.संजय जांभळे यांच्या प्रवेशाने येथील शिवसेना मजबुत होणार आहे. यापुढे पेणचा आमदार शिवसेनेचा असेल, असे आमदार महेंद्र दळवी यांनी झालेल्या बैठकीत म्हटले आहे.

- Advertisement -

गाव तिथे शिवसेनेची शाखा, घर तिथे शिवसैनिक ही संकल्पना राबवून येथील शिवसेना मजबूत करणार. पेणचा आमदार शिवसेनेचा असेल असे संजय जांभवे यांनी यावेळी सांगितले. संजय जांभळे यांचा शिवसेनेत प्रवेश झालेला आहे, त्याच्या प्रवेशाने शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेवर सत्ता यायला हवी, यासाठी प्रयत्न करु या असे नरेश गांवड यांनी या वेळी सांगितले.


हेही वाचा – नुकसानग्रस्त नागरिकांना राज्य सरकार योग्य मदत करणार, अजित पवार यांचे आश्वासन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -