घरमहाराष्ट्रमनसेसोबत युतीची चर्चा; काँग्रेस-भाजप सोडून कोणीही एकत्र येत्र शकतो - मुनगंटीवार

मनसेसोबत युतीची चर्चा; काँग्रेस-भाजप सोडून कोणीही एकत्र येत्र शकतो – मुनगंटीवार

Subscribe

राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप युती होणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. याला कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झालेली भेट. दरम्यान, ही भेट ताजी असतानाच आता माजी वित्तमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे आता राज ठाकरे यांना भेटणार आहेत. त्यामुळे आगामी महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मनसे-भाजप युती होणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

सुधीर मुनगंटीवार राज ठाकरे यांना भेटणार आहेत. राज यांचा मला फोन आला होता, आम्ही लवकरच भेटू, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. भाजप आणि मनसेची युती झाली तर गैर काय? समविचारी पक्ष एकत्र येत असतील तर त्यात गैर काय? असे प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केले. भविष्यात काँग्रेस आणि भाजप सोडून इतर कोणताही पक्ष एकत्र येऊ शकतो, असं सूचक वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मनसेसोबत युतीसंदर्भात बोलताना उत्तर भारतीयांबाबत भूमिका राज यांना स्पष्ट करावी लागेल, असं स्पष्ट सांगितलं. नाशिकमध्ये झालेल्या दोघांच्या भेटीतही परप्रांतीयांचा विषय निघाला होता आणि या बाबतची आपली भूमिका स्पष्ट करणाऱ्या काही क्लिप्स आपण पाठवू, असं राज यांनी नाशिकच्या भेटीत पाटील यांना सांगितलं होतं. त्यानुसार या क्लिप्स राज यांनी पाटील यांच्याकडे पाठविल्या आहेत. या क्लिप्सचा अभ्यास आपण करणार आहोत, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -