घरदेश-विदेशमराठीसह ५ भाषांमध्ये इंजिनिअरिंग आता पूर्ण करा, देशात १४ महाविद्यालयात कोर्सेस सुरु,...

मराठीसह ५ भाषांमध्ये इंजिनिअरिंग आता पूर्ण करा, देशात १४ महाविद्यालयात कोर्सेस सुरु, मोदी सरकारची माहिती

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त एका कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या संवादात त्यांनी नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भातील वर्षभराचा आढावा घेतला. गेल्या वर्षी २९ जुलै रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केलं होतं. या धोरणांतर्गत आज पंतप्रधान मोदी यांनी देशातील आठ राज्यातील १४ महाविद्यालयात मराठीसह ५ भारतीय भाषांमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आल्याची घोषणा केली आहे.

अभियंत्रिकी महाविद्यालयात ५ मातृभाषेत अभ्यासक्रम

यासाठी केंद्राने ८ राज्यातील १४ अभियंत्रिकी महाविद्यालयात ५ मातृभाषेत अभ्यासक्रम सुरु होणार आहे. यामध्ये हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, बांगला अशा भाषांचा समावेश आहे. तर देशातील विविध ११ भाषांमध्ये हा अभ्यासक्रम भाषांतरीत केला जाणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील गरीब, मध्यम, दलित, आदिवासी वर्गातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. कारण या वर्गातील बहुतांश विद्यार्थ्यांना भाषेच्या अडचणीला सामोरे जावे लागत होते. मात्र आता या विद्यार्थ्यांचा सामर्थ्य आणि कौशल्याचा फायदा होईल, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

आर्टिफिशयल इंटेलिजन्स भारतीय युवकांना डिजीटल बनवेल

प्रत्येक क्षेत्रात भारतीय तरुण पुढाकार घेत डिजीटल इंडियाला गती देत आहेत. या युवा पिढीच्या स्वप्नांनुसार वातावरण मिळेल त्यावेळी त्यांच्या शक्तीत किती वाढ होईल विचार करा. हे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण युवकांना विश्वास देते की देश त्यांच्यासोबत आहे. आर्टिफिशयल इंटेलिजन्स भारतीय युवकांना डिजीटल बनवेल.

- Advertisement -

नॅशनल डिजीटल टेक्नॉलॉजी फोरम या दिशेनं डिजीटल आणि टेक्निकल फोरम तयार करण्यासाठी नवे धोरण तयार केले जाणार आहे. देशाची नवीन शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना सक्षम बनवत दबावापासून मुक्त असेल. नव्या बहुविध शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. नव्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडणार आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -