घरक्रीडाTokyo Olympics : भारताचं आणखी एक पदक निश्चित; बॉक्सर लोव्हलिनाची उपांत्य फेरीत...

Tokyo Olympics : भारताचं आणखी एक पदक निश्चित; बॉक्सर लोव्हलिनाची उपांत्य फेरीत धडक

Subscribe

भारताची युवा बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनची ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी सुरु असून तिने भारतासाठी एक पदक निश्चित केलं आहे. लोव्हलिनाने शुक्रवारी महिलांच्या ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत चिनी तैपेईच्या निन-चीन चेनला पराभूत करत उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे.

लोव्हलिनाने निन-चीन चेनला ४-१ ने मात करत ऑलिम्पिकमध्ये भारताचं पदक निश्चित केलं आहे. बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरी गाठली की पदकाची खात्री होते. लोव्हलिनाची उपांत्य फेरीत २०१९ च्या विश्वविजेत्या टर्कीच्या अ‍ॅना लिसेन्कोशी लढत होईल. त्यामुळे ही लढत चुरशी होईल यात शंका नाही.

- Advertisement -

लोव्हलिना बोर्गोहेनने ऑलिम्पिकमध्ये दमदार पदार्पण केलं असून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमधील सलामीच्या लढतीत लोव्हलिनाने जर्मनीची अनुभवी बॉक्सर नादीन अपेट्झचे आव्हान परतवून लावलं. लोव्हलिनाने हा सामना ३-२ असा जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत निन-चीन चेनला पराभूत करत आता उपांत्य साम्यात प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे.

- Advertisement -

सलामीच्या लढतीत अनुभवी बॉक्सर नादीन अपेट्झचा पराभव

महिलांच्या ६९ किलो वजनी गटात खेळणाऱ्या लोव्हलिनाने सलामीच्या लढतीत तिच्यापेक्षा वयाने १२ वर्षे मोठ्या असणाऱ्या नादीन अपेट्झचा ३-२ असा पराभव केला. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी अपेट्झ ही जर्मनीची पहिलीच महिला बॉक्सर होती. याआधी तिने जागतिक स्पर्धेत दोनदा कांस्य आणि युरोपियन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे तिला पराभूत करणे २३ वर्षीय लोव्हलिनाला अवघड जाऊ शकेल असे म्हटले जात होते. परंतु, लोव्हलिनाने संयमाने खेळ केला. तिने योग्य वेळी आक्रमण केले. त्यामुळे पाच पैकी तीन पंचांनी सामन्याचा निकाल तिच्या बाजूने दिला.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -