घरताज्या घडामोडीरायगड जिल्ह्यात होणार शॉर्ट फिल्म फेस्टीवल

रायगड जिल्ह्यात होणार शॉर्ट फिल्म फेस्टीवल

Subscribe

स्थानिक कलाकारांना यामध्ये आपल्या कलागुणांना सादर करण्यास संधी मिळणार.

रायगड जिल्ह्यात शॉर्ट फिल्म फेस्टीवल आयोजन करण्यात येणार आहे. या फेस्टीवलची सुरवात सुधागड तालुक्यातून करण्यात येणार आहे. या निमित्ताने सुधागड तहसिल कार्यालयात माझ्या नवऱ्याची बायको फेम राधिकाची दमदार एन्ट्री झाली. यावेळी राधिका म्हणजेच अनिता दाते केळकर आणि कलाकार गौतम जोगळेकर यांनी फेस्टिवल संदर्भात तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्याशी चर्चा केली. दरम्यान पालकमंत्री आदिती तटकरे व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सदर चित्रफीत सादर केली जाणार, फेस्टिवल संदर्भात नियोजन करण्यासाठी ही भेट असल्याची माहिती तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली आहे.

माझ्या नवऱ्याची बायको फेम राधिकाची सुधागड तहसिल कार्यालयात दमदार एन्ट्री झाली. राधिकाला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली. शॉर्ट फिल्म फेस्टिवल च्या माध्यमातून जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थळे, पर्यटनस्थळे, विविध ज्वलंत प्रश्न , समस्यांना उजाळा देण्याचे काम होणार आहे, विशेष म्हणजे स्थानिक कलाकारांना यामध्ये आपले कलागुणांना सादर करण्यास संधी मिळणार असल्याचे समजते. ‘राधिका’ या छोट्या पडद्यावरच्या भूमिकेनं तिला आणखी लोकप्रियता मिळवून दिली. राधिका घराघरात पोहचली ती तिच्या अफलातुन व भन्नाट अभिनयाने, तिची लोकप्रियता महिला वर्गात तर आहेच मात्र पुरुष ही हा कार्यक्रम आवर्जून पाहतात.

- Advertisement -

नाटक या माध्यमावर प्रेम करणाऱ्या अनिता दातेने मालिका आणि चित्रपटांतल्या भूमिकांमध्येही लक्षात राहील असा पल्ला गाठला. ‘सनई चौघडे’ या २००८ मध्ये आलेल्या चित्रपटापासून ‘जोर लगाके हैय्या’, ‘जोगवा’, ‘गंध’, ‘अडगुळं मडगुळं’, ‘पोपट’, ‘आजोबा’, ‘कॉफी आणि बरेच काही’, हिंदीतला ‘अय्या’ आणि अलीकडचा ‘तुंबाड’ या बहुभाषिक चित्रपटातल्या तिच्या अभिनयाचं कौतुक झाले. टीव्हीवर ‘अग्नीहोत्र’, ‘मंथन’, ‘बंदिनी’, ‘भाई, भय्या और ब्रदर’, ‘बालवीर’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा मराठी-हिंदी मालिका तिने केल्या आहेत.


हेही वाचा – UGC NET 2021 परीक्षेच्या तारखा जाहीर! अर्ज प्रक्रिया सुरू,वाचा संपूर्ण डिटेल्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -