घरट्रेंडिंगViral Photo: काबूलमधून बाहेर पडताच चिमुकलीचा आनंद गगनात मावेना

Viral Photo: काबूलमधून बाहेर पडताच चिमुकलीचा आनंद गगनात मावेना

Subscribe

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा मिळवून ११ दिवस उलटून गेले आहेत. १५ ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्य दिनी तालिबानने अफगाणिस्तानच्या राजधानी काबुलला (Kabul) चारही बाजूने घेरले. त्यानंतर हळूहळू तालिबानने अफगाणिस्तानच्या काही भागांवर कब्जा केला. मग अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी आणि उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी देश सोडला. त्यामुळे अफगाण नागरिकांमध्ये आणखीनच भीतीचे वातावरण तयार झाले. तालिबानी दहशतवाद्यांपासून आपला जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने लोकं अफगाणिस्तान सोडून दुसऱ्या देशात जाऊ लागले. यादरम्यानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. काबूलमधून बाहेर पडताच चिमुकलीचा जो आनंद आहे तो तुम्हालाही गहिवरून टाकणार आहे.

माहितीनुसार हा चर्चेत असलेला फोटो एका लहान अफगाणी मुलीचा आहे. बेल्जियममधील मेल्सब्रोक लष्करी विमानतळावरचा हा फोटो असून काबूलहून चिमुकली परतल्यानंतर मेल्सब्रोकाला पोहोचताच आनंदाने उड्या मारत जाताना दिसत आहे. तिचा हाच आनंद पाहून नेटकऱ्यांना गहिवरुन आले आहे.

- Advertisement -

अनेक देश आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. अमेरिका, भारतासह काही देशांनी बऱ्याच नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढले आहे. पण यादरम्यान गुरुवारी रात्री काबूल विमानतळावर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. यामध्ये अफगाण नागरिकांसह इतर देशातील काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – kabul airport attack: ‘या दहशतवादी हल्ल्यामागे IS संघटना’, काबूल हल्ल्याचा भारताकडून तीव्र निषेध


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -